March 30, 2026
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
             न्हावरे येथील पवार वस्तीत   कार्यसम्राट आमदार ॲड.अशोक पवार यांच्या आमदार निधीतून व्यायामशाळा इमारतीसाठी १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.  

आमदार निधीतून होणाऱ्या या  व्यायामशाळे साठी भूमिपूजन शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागरराजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आंबळे गावचे सरपंच सोमनाथ बेंद्रे, बिरा शेंडगे, संदिप यादव, अरुण तांबे, संभाजी बिडगर, कैलास पवार, इक्बाल शेख, संदिप पवार आदीसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.