March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
             धर्मपीठ, शक्तीपीठ, बलिदानपीक, प्रेरणापीठ श्रीक्षेत्र वडू बुद्रुक (तालुका शिरूर) येथे अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी अमावस्येची नित्य पूजा मोठ्या उत्साहामध्ये करण्यात आली,           

  धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज युवा मंच, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मृती समिती, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते, विशेषतः गावामधील व पंचक्रोशीतील  महिलांचा सहभाग मोठा होता, गेले 25 वर्ष दर अमावस्येला न चुकता हा उपक्रम राबविण्यात येतो, याप्रसंगी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी, पुतळा, अखेरच्या क्षणापर्यंत साथ देणारे मैत्री/ स्वामीनिष्ठ कवी कलश समाधी वर पुष्पहार अर्पण करण्यात आला, ध्येयमंत्र, प्रेरणा मंत्र उच्चार करण्यात आलें,     

 प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबरी जवळील अतिक्रमण हटवण्याचा पाठपुरावा करून प्रत्यक्ष कारवाई करण्याचे आदेश काढल्यामुळे यावेळी उपस्थितांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मनगुटीवार, ऍड,नितीन प्रधान यांचे विशेष आभार मानण्यात आले,

          त्याचप्रमाणे प्रतापगडावरील अब्दु ल्याची कबर अतिक्रमण काढणे कामी हिंदूयोद्धा, मिलिंद भाऊ एकबोटे यांनी 2001 सालापासून लढा दिला, त्यामध्ये त्यांना अनेकदा तुरुंगवासही झाला, एकबोटे यांचे सर्व उपस्थितांच्या वतीने आभार मानण्यात आले, त्यांचा सर्व उपस्थितांच्या वतीने शाल नारळ देऊन सत्कारही करण्यात आला, तसेच अफजलखानाची कबर अतिक्रमण तोडल्यामुळे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला,यावेळी मिलिंद भाऊ एकबोटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले,