शंभूराजे समाधी स्थळाला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी सुमारे 9.5 कोटींचा निधी राज्य शासनाकडून देण्यात आला आहे, कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक ला जोडणाऱ्या तीन किलोमीटर अंतरापैकी दोन्ही बाजूंनी अडीच किलोमीटर सिमेंट काँक्रेट चा रस्ता बनवण्यात आला आहे, दोन्ही बाजूंच्या साईड पट्ट्यांचे काम अजून बाकी आहे, शिवेचा ओढा नजीक पुलाचे काम पूर्ण असून, लेअर कंपनी ते झेड एफ कंपनी पर्यंत रस्त्याचे उत्खनन करून काम प्रलंबित आहे, या अंतरा दरम्यान धूळ व फुफाटा दुचाकी, चार चाकी गाड्या, ट्रक, हायवा डंपर यांच्या दाट वरदळी मुळे वातावरण धुळमय झाले आहे, याचा लोकांना, प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, या रस्त्यावर शंभू भक्त व ग्रामस्थ यांची दाट वर्दळ असते, ही परिस्थिती गेल्या अनेक दिवसांपासून असून ठेकेदाराचे व संबंधित खात्याचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे,संबंधित ठिकाणचा रस्ता तातडीने बनवून घ्यावा अशी मागणी ग्रामस्थ वारंवार करत आहेत,

