धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी खऱ्या अर्थानं देव, देश,धर्म,साठी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज लढले आणि ते जर नसते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज नसते तर या महाराष्ट्रामध्ये हिंदुचं उरले नसते, त्यामुळे ते धर्मवीर आहेतच, त्यांना धर्मवीर नाही असे म्हणणे द्रोह आहे, असे मीडियाशी बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले,
सध्या राज्यामध्ये राजकीय व्यक्तींकडून युग पुरुषांच्या बाबतीत इतिहास सोडून काही विधान केले जात आहेत, त्यामुळे हिंदू धर्मामधील व राज्यांमधील तसे देशामधील लोकांची मने दुखावली जात आहेत, राजकीय व्यक्तींनी राजकारण सोडून, विनाकारण माहिती नसताना इतिहासामध्ये डोकावू नये, असे देखील मत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधिवरील नागरिक व्यक्त करत आहेत, राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे निश्चितच हिंदूंच्या भावनांना पंख मिळाले असून, सत्य हे सत्यच असते हे आता लोकांच्या डोळ्यासमोर आले आहे,
राजकारणाच्या ठिकाणी राजकारण राहू द्या इतिहासाच्या ठिकाणी इतिहास राहू द्या, राज्यातील लोक एवढे दूध खुळे नाहीत की त्यांना दोन्ही छत्रपती चा इतिहास माहिती नाही, त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे “धर्मवीरच” होते हे लोकांना सांगण्याची आता गरज नाही, असे मत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ वढू बुद्रुक (तालुका शिरूर), तुळापूर (तालुका हवेली) येथील नागरिक व ग्रामस्थांनी व्यक्त केले,


