March 30, 2026
सुनील भंडारे पाटील 
       धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्वलंत व खरा इतिहास जगासमोर यावा या उद्देशातून सुरु करण्यात आलेल्या पालखी सोहळ्याचा हे ७ वे वर्ष, या वर्षी दीनांक २० व २१ मार्च रोजी हा पालखी सोहळा होत असुन पहील्या दीवशी म्हणजे २० मार्च रोजी किल्ले पुरंदर ते वाघोली या दरम्यान चारचाकी गाड्यांसोबत पालखी सोहळ्याचा प्रवास होणार असुन २३० चारचाकी गाड्यांची या करीता नावनोंदणी झालेली आहे,  

  दीनांक २१ मार्च रोजी सकाळी ८.०० वाजता वाघोली ते तुळापूर  , वढु हा पायी पालखी होणार असुन यामध्ये  ज्या घराण्यांनी स्वराज्यासाठी त्याग बलिदान केले आहे अशा  घराण्यांच्या वतीने आपल्या राजाला मानवंदना देण्यासाठी २० घराण्यांचे  स्वराज्य ध्वज समाविष्ट करुन घेण्यात आले असुन पालखी सोहळ्याच्या अग्रभागी सरसेनापती हंबीरराव मोहीते यांचा मानाचा ध्वज व अश्व  असणार आहे. या वर्षी पालखी रथाला  भानुदास खांदवे यांच्या बैलजोडीस मान मिळाला आहे .

   २० मार्च रोजी सकाळी ८.०० वा. किल्ले पुरंदरवर  पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पादुकांचा अभिषेक व महाराजांची आरती होणार असुन २१ मार्च रोजी दुपारी १२.०० वाजता तुळापुर येथे छत्रपती श्री संभाजी महाराज यांची आरती पुणे जिल्हाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे . 
पालखी सोहळ्यात सहभागी‌ स्वराज्य ध्वजधारक
१) सरसेनापती हंबीरराव मोहिते 🚩
२) श्रीमंत शितोळे देशमुख 🚩
३) पलांडे इनामदार 🚩
४) भोंडवे (भोसले) 🚩
५) मोरे इनामदार 🚩
६) सरदार गव्हाणे पाटील 🚩
७) श्रीमंत सरदार सूर्यराव काकडे देशमुख 🚩
८) सरदार जगदाळे 🚩
९) सरदार इंदलकर 🚩
१०) सरदार मांढरे 🚩
११) सरदार केसरकर 🚩
१२) सरनौबत जाधवराव 🚩
१३) राजे प्रतिष्ठान 🚩
१४ )सरदार सावंत 🚩
१५) सरदार पिलाजी गोळे 🚩
१६) शिंदे सरकार  🚩
१७) श्रीमंत सरकार बांडे-हवालदार 🚩
१८) सरदार घोरपडे 🚩
१९) सरदार इंगळे  🚩
२०) सरदार जगताप 🚩