सासवड :प्रतिनिधी :बापू मुळीक
बालकल्याण संस्था, राजभवन शेजारी औंध पुणे यांच्या वतीने दिव्यांग मुलांसाठी प्लास्टिकच्या टाकावु वस्तुपासुन फ़्रेम बनविणे ही स्पर्धा नुकतीच आयोजित केली होती यात स्पर्धा परिक्षक म्हणून ओक व साबळे मॅड्म लाभल्या या स्पर्धेत १३ दिव्यांग विशेष शाळांचा समावेश होता यात जिवनवर्धीनी मतिमंद विद्यालय दिवे (ता पुरंदर) शाळेतील प्रणव थोपटे व अनिकेत राजपुरे या विद्यार्थ्यानी मिटाइ बॉक्स, प्लवींगचे टाकावु साहित्य सेलोटेप होल्डर व बटणे इ सर्व टाकावु पासुन रोबोट ची फ्रेम तयार केली व सदर शाळेने तिसरा क्रमांक पटकावला
यात मटाले एस एस यांनी मुलांना मार्गदर्शन केले व सह्कार्य सायली झेंडे(पिलाने), छाया वाघोले,मुख्याध्यपिका वनिता बारवकर ,जाधव शिक्षक स्टाफ ,कर्मचारी वर्ग , पालक संघाचे अध्यक्ष पत्रकार बापू मुळीक उपाध्यक्ष रश्मी विजय जगताप ,सल्लागार समितीचे सुरेश परांजपे , केले संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेव झेंडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

