March 30, 2026
अनिकेत मुळीक लोणी काळभोर
   महाराष्ट्र शासन
   सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय,       क्रमांकः संकीर्ण २०२२/प्र.क्र.१९८/आरोग्य ३
दिनांक : १९ ऑगस्ट, २०२२.सन २०२२-२३ च्या पावसाळी अधिवेशनामध्ये मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांनी विधीमंडळात गुरूवार दिनांक १८ ऑगस्ट २०२२ रोजी दहीहंडी उत्सवादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास त्यांना सर्व शासकीय व निमशासकीय रुग्णालयामध्ये मोफत उपचार देण्याबाबत घोषणा केलेली आहे.

त्यानुसार दहीहंडी उत्सवादरम्यान कोणत्याही गोंविंदास दुखापत झाल्यास त्यास सर्व शासकीय व निमशासकीय रुग्णालयामध्ये मोफत उपचार देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय : २. शुक्रवार दिनांक १९ ऑगस्ट २०२२ रोजी पासून सुरु होणाऱ्या दहीहंडी उत्सवादरम्यान सहभाग घेणाऱ्या गोविंदास दुखापत झाल्यास त्यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय दवाखाने/वैद्यकीय महाविद्यालये/महानगरपालिका/ नगरपालिका/जिल्हा परिषदेचे दवाखाने अशा ठिकाणी नि:शुल्क वैद्यकिय उपचार देण्यात यावेत. सदर शासन निर्णय स्थायी असून

सन २०२२-२३ पासून यापुढे दरवर्षी लागू राहील.