March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
               जागतिक महिला दिनानिमित्त पेरणे (तालुका हवेली) येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी असंख्य महिला उपस्थित होत्या, पेरणे गावचे सरपंच उषा दशरथ वाळके यांच्या प्रयत्नातून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,           

   पेरणे गावामध्ये विविध प्रकारचे सण, यात्रा जत्रा वर्षामधील महत्त्वाचे दिवस साजरे करण्यामध्ये पेरणे ग्रामस्थ कायम आघाडीवर आहेत, पेरणे गावच्या नुकत्याच नवनियुक्त झालेल्या जनतेमधून सरपंच उषा वाळके यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे नियोजन करून महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये मोफत आधार कार्ड शिबिर, मोफत आरोग्य शिबिर, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान, बचत गटातर्फे गावातील शाळांना वृक्ष वाटप, होम मिनिस्टर कार्यक्रम मध्ये आकर्षक बक्षीस मानाची पैठणी, घड्याळ विजेत्यांना देण्यात आले, सायंकाळी स्नेहभोजन ठेवण्यात आले होते,

        यावेळी पोलीस निरीक्षक प्रियांका पवार, डॉक्टर. यशस्विनी अभियान समन्वयक दिपाली शेळके, डॉक्टर शिवांजली वाळके  यांचे मार्गदर्शन झाले, याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अलका वाळके, कल्पना वाळके, अश्विनी ठोंबरे, अंकिता सरडे, मंगल वामने,नंदा ढवळे, सारिका वाळके, शैला ढेरंगे, माधुरी वाळके, आशा साळुंखे, निर्मला वाळके, रेखा वाळके, तृप्ती वाघमारे, मोफत आधार कार्ड शिबिर पुनम भुसे – वाळके  यांचे सहकार्याने राबविले , व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या,