लोणी काळभोर प्रतिनिधी
यावेळी विश्वस्त केशव उमेश विद्वांस उपस्थित होते. देवस्थान व आगलावे बंधूंतर्फे मंदिर प्रांगणात मांडव घालण्यात आले होते, दर्शनबारी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि पिंपरी सेरोलोजिकल ब्लड सेंटर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते त्याला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. दुपारी देवस्थान तर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटण्यात आली. दिवसभर भाविकांची गर्दी कमी जास्त होत होती. दर्शनाला येणार्या भक्तांची गर्दी वाढली. जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने देवस्थान तर्फे जादा सुरक्षा व्यवस्था करण्यात केली होती. ग्रामपंचायती तर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. .चिंचवड देवस्थान ट्रस्ट वतीने माघी गणेश उत्सव साजरा करण्यात आला.
