आंबेगाव प्रमिला टेमगिरे
घोडेगाव (तालुका आंबेगाव) येथे आधार जोडणी साठी घरोघरी भेट अभियान .सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सर्व पर्यवेक्षक तथा मंडल अधिकारी सर्व तलाठी सूचित करण्यात येते की माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार व माननीय मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव विभाग मंचर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी घरोघरी जाऊन नमुना 6B मतदार यादीतील नावासोबत आधार सीडींग साठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यासाठी मतदारांकडून फॉर्म 6b भरण्याची जनजागृती व प्रत्यक्ष कामकाज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे
प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी भागनिहाय किमान 100 मतदारांचे 6B फॉर्म भरणे अनिवार्य करण्यात आले तरी सदर घरोघरी भेट मोहिमेमध्ये सर्वांनी बिनचूकपणे सहभाग नोंदवून कामकाज करणार आहे
सदर मोहिमेमध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय मतदार नोंदणी अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार सर्व पर्वेक्षक तथा मंडल अधिकारी हे स्वतः घरांना भेटी देणार असून मतदारांकडून नमुना सहाब हा फॉर्म भरून घेण्यासाठी जनजागृती करणार आहेत तरी 196 आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना सदर मोहिमेमध्ये सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे
आपली नम्र सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 196 आंबेगाव विधानसभा मतदारसंघ तथा तहसीलदार आंबेगाव

