March 30, 2026
रांजणगाव गणपती संभाजी गोरडे 
        येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एक इसम गावठी कट्टा घेऊन आला असल्याची माहिती रांजणगाव पोलिसांना खबरी मार्फत समजताच  सदर इसमास  बेड्या ठोकण्यात आल्या  असल्याचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी  सांगितले.याबाबत पोलीस कर्मचारी विजय शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.     

  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २८  मार्च सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास  रांजणगाव  एमआयडीसी पोलिसांना  औद्योगिक वसाहती मध्ये गावठी कट्टा बाळगणारा इसम फिरत असल्याची खबर मिळाली होती‌.  औद्योगिक वसाहती मधील बेकार्ट  कंपनी जवळ ओंकार संजय डांगे( वय २०) राहणार यादववाडी ,वाडेगव्हाण ,तालुका पारनेर ,जिल्हा अहमदनगर यास गावठी कट्टा , जिवंत काडतुस व दुचाकी वाहनांसह  ताब्यात घेतले व अवैधरीत्या हत्यार वाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपासणी पोलीस स्टेशन करत आहे. पोलीस कर्मचारी दत्तात्रय शिंदे उमेश कुतवळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.