कामगारांना लाखा दरम्यान हिशेब देवून बोळवू पहाणाऱ्या व ग्रामपंचायतीच्या ६ कोटीवर थकीत करा ऐवजी ११ हजार टिकवू पहाणाऱ्या इस्पात कंपनीला व ती कवडीमोल भावात खरेदी करणाऱ्या युरेनस सॉफ्टेक पार्क या खाजगी कंपनीचे जुनी देणी आधी देणे कर्तव्य होते पण त्यांनी चालाखी दावत कंपनीतून मटेरीयल बाहेर काढत आहेत . बाकी कुणालाही नवीन कंपनी उभारणीस परवानगी तर देणार नाहीच पण गेटवर आंदोलन करून गावचा टॅक्स वसूल करू असा इशारा रामदास दरेकर यांनी दिला आहे .
सध्या ४० कामगार लावून शिक्रापुरचे बाळासो नर्के गॅस एजन्सीकडून १० मोठेगॅस सिलेंडर व १५ ऑक्सीजन सिलेंडर लोखंड व शेड कटींगसाठी वापरत असून सामान हलवण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे . खरेतर चोरी गेलेल्या भंगारातून कंपनीला दहा वेळा कामगारांचा हिशेब व ग्राम पंचायतीचा टॅक्स देता आला असता व आताचे भंगारातूनही देता येईल . तरी खरेदीदार युरेनस पार्कने याचा विचार करून तो गोडीने द्यावा , अन्यथा गेट बंद आंदोलन करावे लागेल असा इशाराही रामदास दरेकर यांनी दिला .



