March 30, 2026

सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले 

 
     थोड्याशा आळसापोटी बेफीकीरीपोटी  असामाजीक प्रवृतींकडून कायदा व 
स्व्वच्छतेची कशी ऐशी की तैशी केली जाते हे मारुंजी येथील एका सुशिक्षित
तरुणाने रस्त्याच्या कडेला मोटरसायकल थांबून कचरा फेकला      

त्याचवेळी
त्याला सुरक्षारक्षकाने अडवले ,नडवले , दरडावत दहा उठा उठाबशा काढायला
लावल्या आणि ग्रामपंचायत मध्ये येऊन पाच हजार रुपये दंड भरा व पुन्हा
रस्त्याच्या कडेला कुठेही कचरा टाकणार नाही अशी मुलाची शपथ घ्यायला लावली .   

विशेष म्हणजे ज्या ठीकाणी फलक लावला होता, त्याच ठिकाणी नेमकी या
महाशयांनी कचरा बॅग फेकली होती .फलकावर स्पष्ट सूचना लिहिली होती येथे कचरा
टाकू नये , टाकल्यास पाच हजार रुपये दंड व दहा  उठाबशा काढाव्या लागतील
,तरीही या सुशिक्षित म्हणावीणाऱ्या व्यक्तीने कचरा टाकलाच व शिक्षा भोगली, अशा स्वरूपाचा कडक नियम आपल्या सभोवतालच्या गावामध्ये झाला पाहिजे, आपल्या भागात देखील कचऱ्याची समस्या खूप आहे, महामार्गाच्या कडेला, गावातील रस्त्याच्या कडेला, अशा अनेक ठिकाणी उघड्यावर कचरा फेकून दिला जातो, कचरा टाकणाऱ्यांना पकडून, दंडात्मक व अशा स्वरूपाची शिक्षा झाली पाहिजे, की जेणेकरून कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीने केलेल्या शिक्षेची लाज वाटली पाहिजे, असे नियम सध्या अंमलात आणण्याची गरज आहे