विशेष प्रतिनिधी
भरारी न्यूजचे मुख्य संपादक सुनील भंडारे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारितेमध्ये सुरुवात करून सर्वसामान्यांचे ज्वलंत प्रश्न हे पत्रकारितातेच्या माध्यमातून वेळोवेळी मांडून शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे.तसेच ज्या ज्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत त्यांच्या पाठीमागे भरारी न्यूजच्या माध्यमातून खंबीरपणे उभे राहून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करणार आहे अशी प्रतिक्रिया भरारी न्युज चे पुणे जिल्हा प्रतिनिधी संजय चांदगुडे यांनी भरारी न्यूजला दिलेली आहे.
भरारी न्युजच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम हे माध्यम गेले अनेक वर्षे झाले करीत आहे,त्यामुळेच ऑल इंडिया मीडिया असोसिएशनच्या सदस्य पदी भरारी न्यूजचे पुणे जिल्हा प्रतिनिधी संजय चांदगुडे यांची निवड ही कायमस्वरूपी करण्यात आलेली आहे.या निवडी पाठीमागे खंबीरपणाने नेहमी साथ देणारे भरारी न्युजचे मुख्य संपादक सुनील भंडारे पाटील यांनी संजय चांदगुडे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
