ऊरुळी कांचन सचिन सुंबे
लेखा परिक्षक पोंदकुले यांनी पदमश्री को ऑप क्रेडीट सोसायटी संस्थेची सन २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षाचे वैधानिक लेखापरिक्षण केले असता या संस्थेकडुन ठेवीदारांच्या रक्कमेतून ८३,२६,३०४/ रुपये एवढी रक्कम बँकेत भरलेली नसल्याचे दिसुन आले .त्यावेळी त्यांनी अधिक चौकशी करून कागदपत्रांची पाहणी केली असता सदर रक्कम या संस्थेचे व्हाईस चेअरमन संजय दिगंबर कांचन व व्यवस्थापक विकास मारुती लोंढे यांनी संगनमत करुन ही रक्कम रोख स्वरुपात काढली असल्याचे दिसुन आले.
संजय कांचन यांनी संस्थेचे इतर संचालक यांच्या अनुपस्थितीमध्ये मासिक बैठक घेवुन बैठकीचे प्रोसिंडीगमध्ये फक्त स्व:ताची स्वाक्षरी करुन संचालकास माहिती न देता ४५,००,०००/- रु रक्कमेची कर्ज प्रकरणे स्व:ताचे सहीने परस्पर मंजुर केले असल्याचे निष्पन्न झाल्याने लेखा परिक्षक यांनी त्यांचे परिक्षणाचे अहवालामध्ये नमुद करुन सदरचा अहवाल उप-निबंधक सहकारी संस्था पुणे शहर, जिल्हा विशेष लेखा परिक्षक वर्ग १ सहकारी संस्था पुणे यांचे कार्यालयात सादर केला असता या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने लेखा परिक्षण यशवंत पोंदकुले यांच्या फिर्यादीवरुन पदमश्री को ऑप क्रेडीट सोसायटीचे सन २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षाचे वैधानिक लेखापरिक्षणामध्ये संस्थेचे व्हाईस चेअरमन संजय दिगंबर कांचन व व्यवस्थापक विकास मारुती लोंढे यांनी संस्थेची एकुण १,२८,२६,३०४ रुपयांची फसवणुक केल्याने लोणी काळभोर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


