आपल्या देशामध्ये तसेच राज्यामध्ये अनेक जाती धर्म गुण्या गोविंदाने नांदत आहेत, काही ठराविक लोक लोकशाहीमध्ये आपले अस्तित्व टिकवण्यासाठी या जाती-धर्माचा फायदा घेत असून, काही ठराविक जाती धर्माचा मतदानाचा प्रवाह आपल्याकडे वळवण्यासाठी सतत काही ना काही उचापती करत असतात, त्यामध्ये काही ठराविक मुठभर मतदानासाठी हिंदू धर्मामधील देवदेवतांवर तसेच युगपुरुषांवर बोलून जातीय तेढ निर्माण करण्याचे सध्या जोरदार प्रयत्न चालू आहे, यामधून राजकारण्यांना आपला स्वार्थ साधायचा आहे, हे सर्व जाती धर्माच्या लोकांच्या लक्षात आले पाहिजे,
काळाच्या ओघात राजकारणी जाती-धर्माचे तेढ निर्माण करून, समाजामध्ये सर्वत्र अशांतता पसरवतात, दंगली घडून येतात,महागाई वाढते, लोक एकमेकांविषयी वाईट बोलतात, परिणामतः त्यामधून लोकांचे जगणे मुश्किल होते, देशामध्ये जातीभेद हे असे विष आहे की यामध्ये सगळे समाज तळागाळाला जातील, त्यामुळे समाजाला आता इतिहास तज्ञ, इतिहास संशोधक, कीर्तनकार, ज्येष्ठ साहित्यिक यांच्या मार्गदर्शनाची गरज असून, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या राजकारणांना हेच इंजेक्शन पुरे आहे,


