आळंदी मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रींचे वैभवी गाभाऱ्यात विविध रंगी आकर्षक फुलांचा वापर करीत पुष्प सजावट करण्यात आली होती. मंदिरात इंदिरा एकादशी निमित्त खिचडी महाप्रसाद आळंदी देवस्थान तर्फे वाटप करण्यात आले. आळंदीतील इंद्रायणी नदी घाटावर दुतर्फ़ा भाविकांनी गर्दी करून स्थान माहात्म्य जोपासत तीर्थ प्राशन करीत स्थान माहात्म्य जोपाले. वारकरी भाविकांनी हरिनाम गजरात नगरप्रदक्षिणा करीत एकादशी साजरी केली. परंपरांचे पालन करीत आळंदी मंदिरात धार्मिक कार्यक्रम महाप्रसाद, महानैवेद्य झाला. विणा मंडपात देहूकर महाराज यांचे वतीने गणेश महाराज साळुंखे यांचे हरिकीर्तनसेवा मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतून झाली. कीर्तनास भाविकांनी गर्दी केली.
यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, विद्या आढाव, अनिता शिंदे, उषा नेटके, चारुशीला पोटफोडे, राधा घुंडरे, शोभा फासगे, कल्याणी मालक, राणी वाघ, पार्वती गव्हाणे, शोभा कुलकर्णी, माजी नगरसेविका उषाताई नरके, लता वर्तुळे, नंदा महाडिक, अरुणा जगताप, सुनीता माने, रेखा मनुरे, उज्वला जुमले, अश्विनी धोटे, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर, राजेश नागरे, सोमनाथ बेंडाले, सरपंच विजय सुतार, माऊलींचे मानकरी गणपत कुर्हाडे पाटील, राजेंद्र जाधव आदीं सह मोठ्या संख्येने महिला, आळंदीकर ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते. इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्याचे आवाहन करीत इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम यांनी केले. इंद्रायणी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी शासनाने तात्काळ उपाय योजना कराव्यात असे आवाहन त्यांनी केले.
