March 30, 2026
पुणे जिल्हा प्रतिनिधी
            इंदापूर येथे दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाच्या सभागृहामध्ये राज्याचे माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धनजी पाटील साहेब आणि भाजपा युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांच्या हस्ते भाजप युवा मोर्चाच्या युवा सदस्यांना विविध पद नियुक्तीच्या पत्राचे वाटप करण्यात आले यावेळी भाजपा युवा मोर्चा इंदापूर तालुका अध्यक्ष तुषार खराडे, नव नियुक्त भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष अनिकेत झेंडे पाटील  व इतर पदाधिकारी व मोठ्या संख्येने युवा वर्ग उपस्थित होता.

            या वेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की युवा सदस्यांनी शासनाच्या सर्व योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी प्रयत्न करावा व भाजपाचे कार्य सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत.भारत हा जगात सर्व क्षेत्रात शक्तिशाली देश म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुढे येत असून देशाने सर्व क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे तसेच सर्वां साठी विविध योजना राबवून सर्व सामान्य व्यक्तींच्या विकासा करिता प्रयत्न केले आहेत.पदाचा उपयोग सर्वसामान्य व्यक्तीच्या विकासाकरिता करावा असे  हर्षवर्धनजी पाटील यांनी उपस्थीत युवा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आवहान केले.

            भाजपा कोअर कमिटी प्रमुख राजवर्धन पाटील म्हणाले की भारताची युवा ही शक्ती असून युवा वर्गाच्या प्रगती करिता भाजप मोठ्या प्रमाणात योजना राबवित असून युवांच्या कल्याणाकरिता युवा मोर्चाच्या सदस्यांनी प्रयत्नपूर्वक कार्य करावे असे आवहान या वेळी करण्यात आले.