March 30, 2026
आळंदी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर 
              इंद्रायणी घाटावर भगवा ध्वज लोकार्पण ; इंद्रायणी आरती उत्साहात झाली. 
अलंकापुरीत इंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता ; इंद्रायणीची आरती ,तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन , महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट येथे नित्य नैमित्तिक नदी घाटावर स्वच्छता करीत घाट पाण्याने स्वच्छ धुवून घेत परिसरात स्वच्छता करण्यात आली. 

              इंद्रायणी नदी घाटावर सामाजिक कार्यकर्ते अनिता झुजम, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, सारिका मेदगे, ईश्वर मेदगे यांचे प्रयत्नातून इंद्रायणी नदी घाटावर ३१ फूट उंचीचा भगवा ध्वज उभारण्यात आला. या ध्वजाची पूजा, इंद्रायणी आरती आणि परिसरात स्वच्छता उपक्रम राबवित भगवा ध्वज अजा एअकादशी दिनी लोकार्पण करण्यात आला. यावेळी हरिनाम गजरा करण्यात आला. एकादशी दिनी इंद्रायणी आरती करून नदी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली. यावेळी महिला भाविकांची उपस्थिती होती.    

            इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणीचे आरतीस राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, शालन होनावळे, नीलम कुरधोंडकर, कल्याणी मालप, विद्या आढाव, अनिता शिंदे, उषा नेटके, चारुशीला पोटफोडे, अलका पतंगे, माजी नगरसेविका उषाताई नरके, लता वरतले, अनिता शिंदे, राणी वाघ, मीना मेहरा, विद्या आढाव, सुमन चव्हाण, शुभांगी यादव, मोहिनी माळवे, नंदा महाडिक, अरुणा जगताप, गोदावरी बिरादार, सविता कांबळे, संगीत केदार, सोनी टिंगरे, मीना शिंदे, द्रौपदी भोसले, कोमल यादव, मीरा कांबळे, प्रमिला रोकडे, राजकन्या सुडे, अरुणा गरड, वत्सल्या दाभाडे, रेखा मनोरे, सुनीता माने, अलका पतंगे, उज्जवला जुमले माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे पाटील, रवींद्र जाधव, वैभव दहिफळे, राजेश नागरे, बाबासाहेब भंडारे, यांचेसह महिला, आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते. 
            इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्यासाठी तसेच स्वच्छता जनजागृती साठी आरती उपक्रम राबविण्यात येत आहे. यात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन अनिता झुजम यांनी केले. तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुपचे वतीने अनिता झुजम, संयोजक अर्जुन मेदनकर यांनी उपक्रमाचे आयोजन केले.