हा वर्धापन दिन साजरा करत असताना आम्हाला आनंद होत आहे, गेल्या अनेक वर्षांच्या पत्रकारितेमधील अनुभवानंतर, समाजातील तळागाळापर्यंत लोकांची सेवा करणे, लोकांच्या अडीअडचणी सोडवणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे,
समाजामध्ये प्रसार माध्यमासाठी काम करत असताना, पत्रकारांना देखील अनेक अडीअडचनी येतात, वेळप्रसंगी पत्रकारांवर हल्ले देखील होतात, सद्यस्थितीत चालू असलेले माध्यम अचानक डोक्यावरचा हात काढून घेते, निस्वार्थी व्यक्तिमत्त्वाचा एक भाग पत्रकारिता असून, निशुल्क सेवा देण्याचे काम पत्रकार करत असतो, त्यामुळे येणाऱ्या अडीअडचणींवर दिलासा देण्यासाठी पत्रकारांची पत्रकारिता ज्वलंत ठेवण्यासाठी एक स्वतंत्र्य व्यासपीठ भरारी या माध्यमातून तयार केले आहे,
पत्रकारिता करत असताना सर्वात महत्त्वाचे सामाजिक प्रश्न असतात, त्यामध्ये समाजातील अनेक स्तर येतात, या स्तरावरील प्रत्येक अडीअडचणी भरारीच्या माध्यमातून आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे, अनेक ठिकाणचे प्रश्न मार्गी देखील लागले आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे, भरारीच्या माध्यमातून सार्वजनिक रस्ते, कृषी क्षेत्रातील अडचणी, महसूल विभागातील अडचणी, शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी, अशा अनेक अडचणींना वाचा फोडण्याचे काम आम्ही केली आहे,
भरारीची वाटचाल चांगली ठेवण्यासाठी आपली कौतुकाची थाप आतापर्यंत ठेवली अशीच कायम राहू द्या, त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये भरारी साठी काम करणाऱ्या सर्वच टीमला एक नवजीवन संजीवनी मिळेल आणि आम्हाला यापुढे आपली सेवा करण्याची संधी मिळेल,
आज भरारी न्यूज डॉट कॉम चा पहिला वर्धापन दिन, यापुढे देखील असे अनेक वर्धापन दिन साजरे करायचे आहेत, जनतेची सेवा करत असताना तुमची सर्वांची साथ हवी आहे, चला तुम्ही आणि आम्ही मिळून समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडूया,
भरारीची प्रगतीच्या दिशेने वाटचाल होणार असून लवकरच आपल्या सेवेत सुधारित तंत्रज्ञानाबरोबर दैनिक वृत्तपत्र आणण्याच्या तयारीत आम्ही आहोत, पुणे जिल्ह्यातील आपल्या हक्काचे प्रसार माध्यम म्हणून आपण www.bhararinews.com या संकेतस्थळावर जाऊन नक्की भेट द्या, एक पाऊल विकासाकडे या संकल्पनेनुसार आम्ही आपल्या सेवेत सदैव तत्पर आहोत, धन्यवाद🙏




















