गणेश शिंदे हे आपल्या पुणे जिल्ह्यातील रासे चाकण या ठिकाणचे मूळचे रहिवासी होते, त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक वर्ष समाजाची सेवा केलेली आहे, विशेष म्हणजे शिंदे हे एका पायाने अपंग असताना देखील त्यांची धावपळ आजही समाजाला प्रेरणादायी आहे, अपंगत्वावर मात करत त्यांनी दिवस-रात्र समाजाची सेवा करत असताना कसलीच कसर केली नाही, त्यांच्या आठवणी निश्चितच समाजाला व पत्रकारांना प्रेरणादायी आहे, काल ते आपल्या सेवेत तत्पर असताना, दुपारी 1:00 वाजता वाशी मुंबई येथे रस्त्यावर चालताना अचानक घसरून पडल्याने प्राथमिक उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला, ते मूळचे रासे चाकण पुणे येथील मूळचे रहिवासी होते, सद्यस्थितीत ते वाशी मुंबई येथे राहण्यास होते, त्यांनी तेज बातमी हे साप्ताहिक मुंबई येथून प्रकाशित केले असून, त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे, त्यांचा मुलगा दुबई येथे सेवेत आहे,

