नागपूर येथील विधानसभेतील अधिवेशनामध्ये अजित दादा पवार यांनी संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हेतच असे बेताल व्यक्तव्य करून तमाम महाराष्ट्राच्या असंख्य शंभू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, शंभूराजे धर्म रक्षणासाठी जगले व हिंदू धर्म रक्षणासाठीच प्राणाचे बलिदान केले, हे त्यांनी विसरता कामा नये, त्यांनी धर्मवीर संभाजी महाराजांचे चरित्र पूर्ण अध्ययन केलेले नाही यावरून त्यांची प्रचिती येते, त्यांनी सर्व मराठी माणसांचा अपमान केला आहे, त्याबद्दल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ वढू बुद्रुक येथे तीव्र स्वरूपाचा निषेध करण्यात आला, शिवाय अजितदादा यांनी समाधीस्थळी येऊन लोटांगण घेऊन माफी मागावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली, तसेच शंभूराजांचा पुण्यतिथीचा दिन हा धर्मवीर बलिदान दिन साजरा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली, यावेळी बहुसंख्येने महिला व ग्रामस्थ, शंभू भक्त उपस्थित होते, याप्रसंगी अनेकदा निषेध निषेध निषेध अशा घोषणा देण्यात आल्या,
यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, शंभू भक्त बबन दरगुडे, नामदेव पोटावडे, गुंडाभाऊ भंडारे, साधना गोलांडे, सुनिता भंडारे, उर्मिला भंडारे, कौशल्य यशवंत,अंजना भंडारे, नीता भंडारे, साधना भंडारे, शकुंतला चव्हाण, मंगल गाजरे, कल्पना नाणेकर, वनिता भंडारे, भामाबाई शिवले, बेबी भंडारे, सोनाली भंडारे, निर्मला भंडारे, सुनिता भोसले, संगीता आरगडे,अक्षता मोरे, रूपाली भंडारे, स्वाती भंडारे, नीलिमा देशमुख, पल्लवी रणदिवे, भिमाबाई भंडारे, व मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या,


