यात्रेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार दिनांक १० रोजी यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते या दिवशी संध्याकाळी देवीच्या छबिन्याचा कार्यक्रम होतो त्यामध्ये भव्य असे दारूगोळा काम तसेच फटाक्यांची आतिषबाजी होते तसेच ढोल पथक, लेझीम पथक, मल्लखांब पथक,दांडपट्टा पथक, छडीपट्टा पथक हे आपली कला सादर करत असतात, तसेच पंचक्रोशीतील खेळांची पथकं हे दरवर्षीप्रमाणे आपली कला सादर करण्यासाठी येत असतात तसेच यात्रा कमिटीचे पंच खेळ पाहून बक्षीस वितरण करतात.
यात्रेच्या चौथ्या दिवशी म्हणजे शनिवार दिनांक ११ रोजी सकाळी दहा वाजता आणि रात्री नऊ वाजता रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा नामांकित लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होत असतो तसेच ते आपली कला सादर करत असतात,तसेच दुपारी तीन वाजता भव्य असे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होत असते यामध्ये नामांकित पैलवान हे निकाली कुस्त्यांचे मैदान गाजवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून येत असतात व आपले कौशल्य यानिमित्त दाखवतात,देवीचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक हे खूप मोठ्या प्रमाणात या यात्रेनिमित्त येतात तसेच अशा प्रकारे अंबिका मातेची यात्रा संपन्न होते.
