प्रहार जनशक्ती पक्षाची गतिरोधक बसविण्याची मागणी..!
शिक्रापूर प्रतिनिधी संदीप ढाकुलकर
शिक्रापूर (पुणे) येथील शिक्रापूर मलटन रोड खूप मोठ्या प्रमाणात वर्दळीचा आहे आणि याच परिसरात नामांकित अशी जि.परिषदेची शाळा आहे या रस्त्यावर बुरुंज वाडीच्या हद्दीत हॉटेल शिवण्या जवळ खूप मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे, येथील अपघात थांबवण्यासाठी व अपघाताला आळा घालण्यासाठी प्रहार जनशक्तीी च वतीने निवेदनाद्वारे गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे,
परिसरातील नागरिकांनी या बाबतची तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाचे शिरूर पदाधिकारी संदीप ढाकुलकर यांच्या कडे केली असता तत्काळ त्यांनी याबाबतचा पाठपुरावा करत जि.परिषद सदस्य स्वाती दत्ताशेठ पाचुंदकर यांची भेट घेत त्याना या बाबतचे निवेदन देण्यात आले ,
हे निवेदन स्वाती पाचुंदकर यांच्या वतीने दत्ता पाचुंदकर यांनी स्वीकारले या मागणीचा शासन स्तरावर पाठपुरावा करून नक्कीच गतिरोधक बसवू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले या वेळी निवेदन देताना प्रहारचे संदीप ढाकुलकर,बुरुंजवाडी गावचे मा. सरपंच दत्ता टेमगिरे ,नवनाथ झांजे , इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते,
