शिक्रापूर येथे दोन कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक चालक गंभीर जखमी
शिक्रापूर प्रतिनिधी संदीप ढाकूलकर
शिक्रापूर (पुणे) येथील पुणे नगर मार्गावर दोन कंटेनरची समोरासमोर धडक होऊन कंटेनर चालक गंभीर असल्याचे समजते,
हाती आलेल्या बातमीनुसार रात्री १२ च्या सुमारास कंटेनर क्रमांक एमएच ०४ जे के ०८६८ नगर बाजूने पुण्याकडे जात असताना जीत ढाब्याजवळ विरुद्ध दिशेने येणारा कंटेनर क्रमांक एमएच १८ ए पी ०४९१ याला समोरासमोर जोरदार धडक होऊन गंभीर जखमी झाले आहे,
अपघातातील चालकाचे नाव बबन ठाकरे वय वर्षे ४८ राहणार मुठा, तालुका मालेगाव जिल्हा वाशिम असे असल्याचे समजते स्थानिक नागरिकांना या बाबत प्रतिनिधी यांनी माहिती विचारली असता रात्री पासून वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या,
शिक्रापूर पोलिसातील कर्मचारी मच्छिंद्र निचित आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर चालकाना त्वरित रुग्णालयात दाखल केले असता बबन ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले .सदर घटना घडल्यानंतर वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती शिक्रापूर पोलिस यांनी रस्त्यावरील कंटेनर बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली,
![]()
