March 30, 2026
धर्मवीर शंभुराजे बलिदान दिनानिमित्त लाखो शंभू भक्त नतमस्तक समाधीवर हेलिकॉप्टर द्वारे पुष्पृष्टी

धर्मवीर शंभुराजे बलिदान दिनानिमित्त लाखो शंभू भक्त नतमस्तक समाधीवर हेलिकॉप्टर द्वारे पुष्पृष्टी

सुनील भंडारे पाटील

धर्मवीर शंभूराजे बलिदान दिनानिमित्त वढू बुद्रुक येथे धर्मवीर शंभूराजे स्मृती समिती, युवा मंच, ग्रामपंचायत वढू बुद्रुक यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते,

धर्मपीठ, शक्तिपीठ, प्रेरणा पीठ, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर संभाजी महाराजांचा 337 वा बलिदान दिन श्रीक्षेत्र वढू बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे बुधवार दिनांक 18 मार्च 2026 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले,

सकाळी पाच वाजता शंभूराजे समाधी, कवी कलश समाधींचा महाअभिषेक व पूजा, सात वाजता मूकपद यात्रा, साडेआठ वाजता जिल्हाधिकारी पुणे जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक हेमंत चोपडे, विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, प्रांत अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार बाळासाहेब मस्के, गट विकास अधिकारी महेश डोके, सर्कल शेख मॅडम, तलाठी घोडे दादा, प्रशासक कृष्णा आरगडे, पोलीस पाटील जयसिंग भंडारे हस्ते शासकीय महापूजा, नऊ ते अकरा दरम्यान हरिभक्त पारायण संग्राम बापू भंडारे यांचे पुण्यस्मरण कीर्तन, 12 वाजता हेलिकॉप्टर द्वारे पुष्पवृष्टी, प्रतिज्ञा व वेदमंत्रोच्चार, पावणे बारा वाजता गृह विभाग , तसेच माजी सैनिकांच्या वतीने शासकीय मानवंदना देण्यात आली,

अहिल्यानगरचे आमदार संग्राम भैय्या जगताप यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मृत्युंजय पुरस्कार , तसेच आमदार महेश दादा लांडगे, पांडुरंग बलकवडे, संजय मरकड, निलेश तरस, राजेंद्र तरस, यांना शंभू सेवा पुरस्कार देण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे कुशाल सातव यांना शंभू तेज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,

या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, शंभू छत्रपतींचे वंशज वृषाली राजे भोसले, सेवानिवृत्त आयजी नाशिक शेखर पाटील, आमदार माऊली आबा कटके,राष्ट्रसंत भाऊ महाराज परांडे, श्री भारतानंद स्वामी, माणिक महाराज मोरे यांनी उपस्थित राहून शंभू महाराजांचे दर्शन घेतले,

बलिदान दिनी धर्मपंढरी श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंडी तसेच ज्योत आल्या होत्या,

बलिदान दिनाच्या दिवशी अन्नदान, महारक्तदान महायज्ञ, शंभू भक्तांच्या वतीने करण्यात आला,त्याचप्रमाणे सायंकाळी छावा नाटकाचे प्रक्षेपण होणार आहे,

तसेच बलिदान दिनानिमित्त पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने पार्किंग व्यवस्था, वाहतुकीचे नियोजन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अशी माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी दिली,