March 30, 2026
घनकचरा व्यवस्थापनासाठी शिक्रापूर, सणसवाडीचे सरपंच यांची नाशिक येथील प्रकल्पाला भेट

घनकचरा व्यवस्थापनासाठी शिक्रापूरचे , सणसवाडीचे सरपंच यांची नाशिक येथील प्रकल्पाला भेट..!

शिक्रापूर प्रतिनिधी संदीप ढाकूलकर 

शिक्रापूर (पुणे) येथे सध्या कचऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे त्याच पार्श्वभूमीवर शिक्रापूर येथील सरपंच आणि उपसरपंच प्रकाश वाबळे यांनी नाशिक येथील कचरा प्रकल्पास भेट देऊन तेथील पाहणी केली या वेळेस त्यांच्यासोबत ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ चे कार्याध्यक्ष योगेश पाटील,सणसवाडीचे सरपंच राजेंद्र दरेकर,शिक्रापूर चे उपसरपंच प्रकाश वाबळे यांची आज ‘MACCIA’ ला भेट दिली,

1.नाशिक महानगरात वसलेल्या अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत ग्रामीण भागातील घन कचरा संकलित करून त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग यशस्वीपणे कार्यरत आहेत.या उद्योगांचा अभ्यास करण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील सणसवाडीचे सरपंच राजेंद्र दरेकर, शिक्रापूर चे सरपंच रमेश गडदे व उपसरपंच प्रकाश वाबळे यांनी भेट देऊन माहिती घेतली,

घन कचरा उद्योगांना भेटी दिल्यानंतर दरेकर, गडदे आणि  वाबळे यांनी ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ चे कार्याध्यक्ष व प्रमुख समन्वयक योगेश पाटील यांच्यसमवेत ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर – MACCIA’ च्या नाशिक येथील कार्यालयाला भेट दिली.

MACCIA’ च्या वतीने लवकरच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ‘एक गाव – एक उद्योजक’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक तालुक्यातून गाव निवड करण्याच्या कामात ‘राष्ट्रीय सरपंच संसद’ ‘MACCIA’ ला सहकार्य करणार आहे.

नाशिक येथील MACCIA’ भेटीत सणसवाडी व शिक्रापूरच्या सरपंच व उपसरपंचांनी ‘गाव तिथे उद्योजक’ ही संकल्पना समजून घेतली.योगेश पाटील, राजेंद्र दरेकर,रमेश गडदे व प्रकाश वाबळे यांना यावेळी ‘MACCIA’ तर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘चेंबर पत्रिका’ या मासिकाचा अंक भेट करण्यात आला,शिक्रापूर येथील कचऱ्याच्या प्रश्नासाठी वेळोवेळी प्रहारचे पदाधिकारी संदीप ढाकुलकर यांनी पाठपुरावा केला आहे,