लोणीकंद पेरणे जि प गटात जि प सदस्य पै किरण साकोरे यांनी चालू केली विकास कामे
सुनील भंडारे पाटील
पेरणे (तालुका हवेली) येथे 15 टक्के ग्रामनिधी मधून वार्ड क्रमांक दोन गुरुदत्त नगर येथील बंदिस्त गटर लाईन या कामाचे पैलवान किरण संपत साकोरे सदस्य जिल्हा परिषद पुणे, हवेली पंचायत समितीचे मा उपसभापती माऊली अण्णा वाळके, राणी दत्तात्रय वाळके सदस्य पंचायत समिती हवेली यांच्या हस्ते भूमिपूजन झाले,
या कामासाठी ग्रामपंचायत सदस्य मा उपसरपंच अक्षय ज्ञानेश्वर वाळके यांनी पाठपुरावा केला होता याप्रसंगी सरपंच उषा दशरथ वाळके, उपसरपंच अलका मोहन वाळके, ग्रामपंचायत सदस्य शैला दत्तात्रय ढेरंगे, माधुरी नवनाथ वाळके, ग्राम विकास अधिकारी दादाभाऊ नाथ, मा सरपंच निलेश वाळके, मा उपसरपंच शिवाजीराव वाळके तसेच गुरुदत्त नगर व जालिंदरनाथ नगर कॉलनीचे नागरिक उपस्थित होते,
यावेळी नवनिर्वाचित पुणे जिल्हा परिषदेचे लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटाचे सदस्य पैलवान किरण साकोरे यांनी सांगितले की येणाऱ्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून विविध विकास कामांना निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले, तसेच जनतेच्या प्रश्नांना व अडचणींना कायम प्राधान्य देऊन कामे केली जातील असे साकोरे यांनी यावेळी सांगितले,
