March 30, 2026
आपटी मधील जमीन गैरव्यवहार विरोधात दीपिका भालेराव यांनी उपसले उपोषणाचे शस्त्र

आपटी मधील जमीन गैरव्यवहार विरोधात दीपिका भालेराव यांनी उपसले उपोषणाचे शस्त्र

सुनील भंडारे पाटील

दिनांक 9/12/2025 रोजी प्राप्त झालेले कारवाईचे पत्र त्या पत्रा नुसार कोणतीही कारवाई झालेली  नाही, त्यामुळे  निळे वादळ सामाजिक आणि शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या संस्थापिकी अध्यक्ष दीपिका ताई भालेराव यांनी शिरूर तहसीलदार येथे बेमुदत उपोषण पुकारले असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे,

आपटी गावातील सातबारा गट नंबर 108/1 जिल्हाधिकारी पुनर्वसन असून यामधील भूखंड देण्यात आले त्याची खरेदी विक्री करताना शासकीय कोणतीच परवानगी घेतली नसून तसेच पीएमआरडी यांची परवानगी नाहीये सातबारा वरील सर्व भूखंड बेकायदेशीर आहेत तसेच गावातील झालेली शेतीची गुंठेवारी गट नंबर 114/1 तसेच गट नंबर 36 यामधील गुंठे वारी बेकायदेशीर असून त्याच्या वर लवकरात लवकर कारवाई करावी. तसेच पुनर्वसन भूखंडावरील अतिक्रमण हटवण्यात यावे यासाठी 23/2/2025 रोजी तहसीलदार कार्यालयातील आवारात वेमुदत उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा भालेकर यांनी दिला होता,

आपटी गावातील महार वतन गट नंबर 168 तसेच गट नंबर 169 गट नंबर 344 या मधील झालेली खरेदी विक्री चुकीची असून, यामधील महत्त्वाचा मुद्दा ,की वंशावळ पूर्ण केलेली नाही तसेच कलम कलम 63/ (1) चे शर्त भंग झालेली असून मूळ मालक यांच्याशी फसवणूक करून हक्कसोडपत्र व साठेखत हे 100 रु च्या स्टॅम्प वर केले असून ते 3 महिन्याच्या मुदतीत संपले आहे,

त्याच्या आधारे खरेदीखत केलेले असून ही केवळ लोंकाचीच नाहीतर शासनाची सुद्धा फसवणूक केली आहे, हे क्षेत्र खरेदी करणाऱ्या सर्वच लोंकावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच सातबारा वरील नाव नोंदणी करणारे शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी निवेदन द्वारे करण्यात आली होती, त्यानुसार 23/2/2026 रोजी शिरूर तहसीलदार आवारात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे,

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या

१)भूखंडाची झालेली खरेदी विक्री यातील संबंधित व्यक्ती आणि अधिकारी वर्ग यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी,

२)संबंधित अतिक्रमण भूखंडावरील तात्काळ अतिक्रमण हटवावे

३)बेकायदेशीर झालेल्या खरेदी-विक्री भूखंडाची सात वाऱ्यावर नोंद करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबन करण्यात यावे.

४)महार वतनाची शेती चुकीची खरेदी करणाऱ्या खरेदी धारकांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे,

५)महार वतन कोळ कायदा 63(1) अंतर्गत कारवाई करणे तसेच ज्याशर्त भंग बंद झाली आहे. त्या जमिनी सरकर जमा करणे

६)पुनर्वसनगावठाणाची नकाशानुसार मोजणी करून तात्काळ अतिक्रमण हटवणे, अनधिकृत झालेल्या प्लॉटिंगवर तात्काळ कारवाई करणे,अशा मागण्या आंदोलकांनी केले आहेत,