चास येथे महिला उद्योजिकांना एमएसडीपी प्रमाणपत्र वितरण
आंबेगाव प्रतिनिधी प्रमिला टेमगिरे
चास (तालुका आंबेगाव) येथे ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने आयोजित २० दिवसीय सूक्ष्म कौशल्य उद्यमिता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या महिला उद्योजिकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
अहमदाबादस्थित भारतीय उद्योजकता विकास संस्थान (EDII) व Accenture यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच उमेद अभियान व ग्रामपंचायत चास यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रशिक्षणादरम्यान महिलांना विविध प्रकारच्या तेलबियांपासून थंड दाब पद्धतीने शुद्ध तेल निर्मिती तसेच मसाला प्रक्रिया यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय उत्पादनांना स्पर्धात्मक बाजारपेठ मिळावी यासाठी पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि मार्केटिंग याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शनही करण्यात आले.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्य मा. उषाताई कानडे होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून सरपंच अर्चनाताई बारवे उपस्थित होत्या.
यावेळी उपसरपंच मनिषा चासकर, कल्पवृक्ष फाउंडेशनचे प्रदीप चव्हाण, EDII चे भगवान हरकळ व विकास गोफणे, ग्रामसेविका वैशाली गवारी, यशोगाथा ग्रामसंघाच्या अध्यक्षा संध्या चव्हाण, सचिव सोनल भोर, कोषाध्यक्ष सुवर्णा बारवे, प्रभाग संघाचे अध्यक्षा जयश्री दही तुले प्रशिक्षिका वैशाली खिल्लारी, ग्रामसखी सुप्रिया बारवे, ज्येष्ठ नागरिक संघाचे इनामदार सर, मारुती भोर, शंकर बारवे, चंद्रकांत बारवे, पूजा भोर, ज्योती भोर, सोनाली भोर, संध्या चव्हाण, रजनी मिरके मॅडम,शोभा बारवे,सुशीला घोडे,सुरेखा भोर,कोमल,भाग्यश्री चासकर, काळोखे,आदी उपस्थित होते. तसेच ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी महिलांनी उद्योजकतेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनून कुटुंब व समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन केले. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वउद्योग उभारण्याचेही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुप्रिया बारवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संध्या सुभाष चव्हाण यांनी मानले . कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.
![]()
