जागतिक महिला दिनानिमित्त मंचर येथे उद्योजिका महिला सन्मान
आंबेगाव प्रतिनिधी प्रमिला टेमगिरे
मंचर (ता.आंबेगाव) येथे जागतिक महिला दिनानिमित्त मंगलमूर्ती आयोजित उद्योजिका महिलांचा सन्मान सोहोळा मोठ्या उत्साहा मध्ये पार पडला.
कार्यक्रमाच्या नियोजनकर्ते शिल्पा लेडीज पार्लर , कार्यक्रमाचे संयोजन समितीचे सदस्य अंबिका अलंकार, महालक्ष्मी ज्वेलर्स, सारिका, अनुष्का, निकिता, कावेरी, प्रसन्न मेकअप आर्टिस्ट. यांनी विविध प्रकारच्या भेटवस्तू देऊन महिलांना सन्मानित करण्यात आले ,
प्रतिवर्षी या संयोजक समितीचे महिला दिनाच्या दिवशी महिलांसाठी खूप मोलाचे योगदान असते.महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते या दिवशी महिलांसाठी मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून महिला आपापले मनोगत व्यक्त करताना आपल्या आयुष्यातील अनुभव व्यक्त करतात.
या सर्व गोष्टींचा विचार आपल्या सर्वांच्या लाडक्या शिल्पा भाबी नेहमीच महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात त्यामुळे महिला उत्साहित होऊन पुढे येतात महिला सक्षमीकरण या विषयावर चर्चा करण्यात येते,
नवीन उद्योग व्यवसायाविषयी चर्चा केली जाते. महिलांसाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध कर्ज योजनांची व वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती देण्यात आली. महिला दिनानिमित्ताने या सर्व महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने होता. विशेष करून वंचित घटकातील व एकल महिलांचा देखील सन्मान केला जातो,हा कार्यक्रम सन्मान सोहोळा प्रति वर्षी आनंदात होत आहे,
