शिक्रापूर प्रतिनिधी संदिप ढाकुलकर
शिक्रापूर (पुणे) येथील वल्लभ नगर कॉलनी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ,या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या मोनिका हरगुडे,शिक्रापूर नगरीच्या माजी उपसरपंच पूजा भुजबळ,माजी उपसरपंच सुजाता खैरे उपस्थित होत्या,
यावेळी मोनिका हरगुडे यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले महिला ह्या पूर्वीप्रमाणे चूल आणि मूल या मधेच गुंतून न राहता आता प्रत्येक कामात पुढाकार घेताना दिसत आहे या गोष्टीचा अभिमान आहे असे वक्तव्य केले घरातील प्रत्येक व्यक्तीची मोठी जबाबदारी ह्या महिलाच पार पाडत असतात घराला घरपण द्यायला महिलांची प्रमुख भूमिका असते असे मनोगत त्यांनी या वेळी व्यक्त केले,
पूजा भुजबळ यांनी वर्षातील ३६५ दिवस हा महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा प्रत्येक दिवशी महिलांचा सन्मान करण्यात यावा असे मनोगत यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केले. महिलांच्या प्रत्येक अडचणीत आपण कायम पाठीशी राहू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले ,
या कार्यक्रमास वल्लभ नगर येथील महिला वर्गानी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली सगळ्या महिलांनी एकजूट होऊन आपली स्त्री शक्ती दाखवावी असे आवाहन सर्वच मान्यवरानी केले या वेळेस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वल्लभ नगर येथील उगले ताई यांनी केले आणि महिला दिनानिमित्य पुरुष मंडळीनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल
वल्लभ नगर येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे शिरूर तालुका कार्याध्यक्ष संदीप ढाकुलकर आणि वल्लभ नगर येथील पुरुष मंडळीचा सन्मान देखील महिलांच्या वतीने जिल्ला परिषद सदस्या मोनिका हरगुडे,पूजा भुजबळ, सुजाता खैरे यांनी केले या वेळेस वल्लभ नगर येथील सर्व पुरुष मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,
यावेळी सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले आणि महिला दिननिमत्य केक कापून आणि अल्पोपहार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या वेळेसबाल गोपाळ मंडळी सुद्धा मोठ्या आनंदात सहभागी झाले होते

मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील


