Homejunnarनारीशक्ती सामाजिक महिला संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी शिरोली बुद्रुक उपसरपंच वैशाली थोरवे यांची...

नारीशक्ती सामाजिक महिला संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी शिरोली बुद्रुक उपसरपंच वैशाली थोरवे यांची निवड

जुन्नर प्रतिनिधी
           जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक गावच्या उपसरपंच वैशाली थोरवे या अनेक वर्षापासून गावातील अनेक बचत गटांना व्यावसायिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन करत असतात.

         नारी शक्ती सामाजिक महिला संस्था ही संपूर्ण महाराष्ट्रभर महिलांसाठी काम करीत असून या संस्थेमध्ये वैशाली ताई थोरवे यांना नाम मात्र सभासद करून थोरवे यांची महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याचे पत्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल भापकर आणि सचिव हेमलता दत्तात्रय निंबाळकर नारीशक्ती सामाजिक महिला संस्था महाराष्ट्र राज्य यांनी शिरोली गावच्या विद्यमान उपसरपंच वैशाली थोरवे यांना दिले .

              संस्थेने नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रामध्ये महिलांसाठी काम करण्यासाठी यांची निवड करण्यात आली आहे तसेच त्यांचीही काम करण्याची इच्छा असल्याची खात्री झाल्यामुळेच संस्थेने त्यांची प्रदेशाध्यक्ष या पदावर निवड केली आहे वैशाली थोरवे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्यासह गावातील ग्रामपंचायत शिरोली बुद्रुक गावचे सरपंच प्रदीप थोरवे त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . शुभेच्छा देतेवेळी वैशाली थोरवे यांचे पती दत्तात्रय थोरवे, विघ्नह ट्रान्सपोर्टचे सचिन हाडवळे गणेश थोरवे, सुनील विधाटे ,स्वप्निल लोहकरे, मा ग्रामपंचायत सदस्य संजय उकिरडे, सुषमा उकिरडे अनिता राऊत त्याचबरोबर प्रियंका राऊत रत्नमाला थोरवे सुरेखा थोरवे वडगाव सहानी सरपंच वैशाली तांबोळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!