Homekoregaon bhimaसेवाधामला डिलाईट फार्मसीचे मोफत आरोग्य शिबिर 

सेवाधामला डिलाईट फार्मसीचे मोफत आरोग्य शिबिर 

सेवाधामला डिलाईट फार्मसीचे मोफत आरोग्य शिबिर 

सुनील भंडारे पाटील

पिंपळे जगताप (तालुका शिरूर) येथील सेवाधाम या मतिमंद मुलांच्या महाविद्यालयास डिलाईट कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन तेथील मुलांची मोफत आरोग्य तपासणी केली,

मुलांना दैनंदिन लागणाऱ्या आवश्यक वस्तूंचे व खाऊचे वाटप केले. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सार्वजनिक उपक्रमाचे सेवाधाम चे संचालक डॉ.पवन कट्यारमल यांनी कौतुक केले,

गेली सहा ते सात वर्ष सातत्याने डिलाईट कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थी या ठिकाणी भेट देतात व मुलांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना दैनंदिन लागणारे आवश्यक वस्तू तसेच खाऊचे वाटप करतात,

मतिमंद मुलांबरोबर वेळ घालवून फार्मसीची मुलं त्यांना आनंद देतात, यावर्षी न्यू लाईफ आयुर्वेद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराच आयोजन केले होते,

डॉ.विलास गिरी व परिचारिका कल्पना घायतडक यांनी मुलांची तपासणी केली. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक अल-अमीन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नासिर शेख, सहसचिव जाहीद शेख संस्थेचे कार्यकारी अधिकारी अमीर इनामदार व प्राचार्य डॉ.संपत नवले यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. अनिल पांचाळ व प्रा. प्रतीक्षा गोरे यांनी केले.

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!