March 30, 2026
गुढीपाडवा व भरारी न्यूज वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

भरारी न्युज वृत्तसेवा

गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ मानला जाणारा अत्यंत महत्त्वाचा सण असून तो प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. म्हणून आम्ही मराठी अस्मिता जपत स्वाभिमानाने भरारी न्युजचा वर्धापन दिन गुढीपाडव्याला साजरा करत आहोत, हा भरारी न्युजचा चौथा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा,

पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, तसेच प्रभू श्रीराम अयोध्येत परतल्यानंतर विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते.गुढी म्हणजे विजय, समृद्धी आणि शुभत्वाचे प्रतीक. घराच्या दारात उभारलेली गुढी ही वाईट शक्तींवर विजय मिळवून चांगल्या गोष्टींचे स्वागत करण्याचे चिन्ह मानली जाते.

या दिवशी कडुलिंब आणि गूळ खाण्याची प्रथा आहे. गुढीपाडवा हा केवळ सण नसून तो संस्कृती, परंपरा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला एक शुभमूहुर्त आहे. या दिवशी लोक नवीन कामांची सुरुवात करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देऊन आनंद वाटतात. तुम्हीही आपल्या प्रियजनांना आप्तेष्टांना गुढीपाडव्याच्या व नव वर्षाच्या या गोड शुभेच्छा नक्की द्या.

गुढीपाडवा म्हणजे नव्या वर्षाची सुरुवात आणि नव्या आशांचा पहिला दिवस. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या या पवित्र दिवशी संपूर्ण सृष्टी नवचैतन्याने फुलून येते. घराघरांत उभारली जाणारी गुढी ही विजय, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक आहे. हा सण आपल्याला सांगतो की प्रत्येक शेवटानंतर एक नवी सुरुवात असते. भारतीय परंपरेत गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे, कारण तो केवळ दिनदर्शिकेतील बदल नाही, तो जीवनातील बदलाची संधी आहे. जुन्या आठवणी, दुःख आणि अपयश मागे ठेवून पुढे जाण्याची प्रेरणा या सणातून मिळते. गुढी उभारणे म्हणजे आपल्या घरात यश आणि आनंदाचे स्वागत करणे होय. या दिवशी केलेले संकल्प आणि सुरू केलेली नवी कामे शुभ मानली जातात.

आजच्या धकाधकीच्या जीवनात थांबून स्वतःकडे पाहण्याची ही एक संधी आहे. नव्या वर्षाची सुरुवात सकारात्मक विचारांनी आणि उत्साहाने करूया. आपल्या नात्यांना अधिक घट्ट करण्यासाठी हा सण एक निमित्त ठरतो. एक साधा शुभेच्छा संदेशही नव्या वर्षाची गोड सुरुवात करू शकतो. म्हणूनच या गुढीपाडव्याला आनंद, आरोग्य आणि समृद्धीच्या शुभेच्छा एकमेकांपर्यंत पोहोचवूया. कारण गुढीपाडवा हा केवळ सण नाही—तो नव्या आयुष्याची नवी पहाट आहे. चला, या मंगलदिनी नव्या उमेदीनं आणि विश्वासानं पुढे जाऊया.

नूतन वर्षाभिनंदन ! नूतन वर्षाभिनंदन !

श्रीखंड पूरी,रेशमी गुढी,लिंबाचे पान,नव वर्ष जाओ छान नूतन वर्षाभिनंदन !

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

उभारुन आनंदाची गुढी दारी जीवनात येवो रंगत न्यारी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभ गुढीपाडवा ,जल्लोष नवं वर्षाचा ,मराठी अस्मितेचा,हिंदू संस्कृतीचा,सण उत्साहाचा

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! अभिमानाची गुढी दारी, हीच खरी संपत्ती.काठीला गंध, फुलं, अक्षता ,नैवेद्याला साखर, पेढा, दुधाचा लोटा,लावावे निरांजन, दाखवावी उदबत्ती,अभिमानाची गुढी दारी,,हीच खरी संपत्ती.

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !,मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!,चंदनाच्या काठीवर,शोभे सोन्याचा करा,साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा,मंगलमय गुढी,भरजरी खण,स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण

गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !चैत्राची सोनेरी पहाट,नव्या स्वप्नाची नवी लाट,नवा आरंभ, नवा विश्वास,नवीन वर्षाची हीच खरी सुरुवात,

गुढीपाडवा नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !, पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा! दुःख सारे विसरून जाऊ,सुख देवाच्या चरणी वाहू,स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,नव्या नजरेने नव्याने पाहू

गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा! गुढी उभारून आकाशी, बांधू तोरण दाराशी,गुढी उभारून आकाशी,बांधू तोरण दाराशी,काढू रांगोळी अंगणी,हर्ष पेरूनी मनोमनी,करू सुरुवात नववर्षाची

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

नवीन वर्षी होवो सर्व स्वप्न साकार,सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट,आनंदाची उधळण, सुखाची बरसात,नवीन वर्षी होवो सर्व स्वप्न साकार

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा,गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!,प्रसन्नतेचा साज घेवून आले नवीन वर्ष,तुमच्या जीवनात नांदो सुख, समृद्धी आणि हर्ष

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढीपाडवा अन् नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,उभारू गुढीलावू विजय पताका,गुढीपाडवा अन् नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा

नवी सकाळ, नवी उमेद,नवे संकल्प, नवा आनंद,पूर्ण होवोत तुमच्या इच्छा

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढी मराठी संस्कृतीची,गुढी उभारु आनंदाची, समृद्धीची,गुढी आरोग्याची, उत्तुंग यशाची,गुढी मराठी संस्कृतीची,गुढी मराठी अस्मितेची

गुढीपाडव्यासह मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!

चैत्र पाडव्याच्या शुभेच्छा,आशेची पालवी, सुखाचा मोहर,समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,चैत्र पाडवा, नव वर्षाच्या शुभेच्छा खास तुमच्यासाठी

शुभ गुढीपाडवा!”

“नक्षीदार काठी, त्यावर रेशमी वस्त्र,साखरेची गाठी आणि कडुनिंबाचे शास्त्र,गुढीपाडवा म्हणजे विजयाचे अस्त्र.

शुभ गुढीपाडवा!”,

नूतनवर्षाभिनंदन !!नेसून साडी माळून गजरा,उभी राहिली गुढी,नव वर्षाच्या स्वागताची,ही तर पारंपारिक रूढी,रचल्या रांगोळ्या दारोदारी,नटले सारे अंगण,प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन,सुगंधीत जसे चंदन…

नूतनवर्षाभिनंदन !!

गुडीपाडव्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा,निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी,नवे नवे वर्ष आले,घेऊन गुळा साखरेची गोडी

गुडीपाडव्याच्या शुभेच्छा

नूतन वर्षाभिनंदन!,शांत निवांत शिशिर सरला,सळसळता हिरवा वसंत आला,कोकिळेच्या सुरवातीसोबत,चैत्र “पाडवा” दारी आला…

नूतन वर्षाभिनंदन!

मराठी नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,वसंतस्यागमे चैत्रे वृक्षाणां नवपल्लवाःतथैव नववर्षेडस्मिन् नूतनं यश आप्नुहि,गुढीपाडव्यासह मराठी नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,

BREAKING Loading news...