Homepuneआधार फाउंडेशन तर्फे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस,बालवाडी सेविका,युवा कुस्तीपटू...

आधार फाउंडेशन तर्फे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस,बालवाडी सेविका,युवा कुस्तीपटू यांचा सन्मान

आधार फाउंडेशन तर्फे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस व बालवाडी सेविका तसेच युवा कुस्तीपटू यांचा सन्मान सोहळा आयोजित ..!

शिक्रापूर प्रतिनिधी संदिप ढाकुलकर 

शिक्रापूर (पुणे) येथे महिला दिन आणि क्रांज्योती सावित्री बाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करून करण्यात आले,

आधार फाउंडेशन तर्फे सर्व महिलांचे मानाचा फेटा आकर्षक ट्रॉफी व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी मा जि परिषद सदस्य कुसुमताई मांढरे, माजी ग्रा प सदस्य शीलाताई करंजे, मा उपसरपंच मोहिनी ताई मांढरे ,पूजाताई भुजबळ ,सुजाता मामी खैरे ,मीनाताई सोंडे ,मनीषाताई गडदे ,

वैशालीताई खेडकर ,रेणुका ताई थिटे ,मुख्याध्यापिका सौ शारदा दरवडे ,अंगणवाडी पर्यवेक्षक सौ गायत्री ताई धावडे ,कृषी अधिकारी सौ संध्याताई डोंगरे,आधार फाउंडेशन उपाध्यक्ष पल्लवी हिरवे ,सदस्य अलकाताई सासवडे ,कमल जगदाळे ,शितल जाधव ,युवा कुस्तीपटू पै सानिका काळे ,ज्ञानेश्वरी खैरे तसेच सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस बालवाडी सेविका उपस्थित होते ,

या कार्यक्रमाप्रसंगी जि प सदस्य कुसुमताई मांढरे चाकण बीट विस्तार अधिकारी या राजेंद्र टिळेकर सर सुभाष मामा खैरे पूजाताई भुजबळ मोहिनी ताई मांढरे सर्व बालवाडी सेविका मदतनीस व अंगणवाडी सेविका यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका शारदा दरवडे मॅडम यांनी केले आभार आधार फाउंडेशन उपाध्यक्षा पल्लवी हिरवे व निलेश जगताप यांनी मानले व सर्व महिलांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली,

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!