Homehaveliधर्मवीर शंभूराजे पुण्यतिथीनिमित्त तुळापूर येथे जि प सदस्य पै साकोरे,हवेलीचे ग वि...

धर्मवीर शंभूराजे पुण्यतिथीनिमित्त तुळापूर येथे जि प सदस्य पै साकोरे,हवेलीचे ग वि अधिकारी शेलार यांची नियोजनासाठी भेट

ब्रेकिंग न्यूज
पुणे पोर्शे क्रॅश प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आरोपी चालकाच्या वडिलांना जामीन मंजूर केला‘हे लव्ह जिहादचे प्रकरण होते’: पुणे मॉडेल सायली सुर्वेचा आंतरधर्मीय विवाहानंतर छळाचा आरोप, हिंदू धर्मात पुन्हाशिक्रापूर येथील वल्लभ नगर कॉलनीत जागतिक महिला दिन उत्साहातधर्मवीर शंभूराजे पुण्यतिथीनिमित्त तुळापूर येथे जि प सदस्य पै साकोरे,हवेलीचे ग वि अधिकारी शेलार यांची नियोजनासाठी भेटकुंभनंतर नाशिकला गुंतवणुकीचे चुंबक बनवण्यासाठी रु. 25,000 कोटी पायाभूत पुशः मुख्यमंत्रीNH7 वीकेंडर पुण्याला परतला म्हणून फॅन्स विभाजित झाले आणि स्वदेशी इंडी टॅलेंटवर लक्ष केंद्रित केलेथोरांदळे पुणे येथे जागतिक महिला दिनानिमित्त उद्यमिता विकास कार्यक्रमाचा शुभारंभPMC आयुक्त आज आर्थिक वर्ष 2026-27 चा प्रारूप बजेट सादर करणार आहेत22 जणांवर 4.2 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी कुटुंबातील चार जणांवर गुन्हा दाखलGRAS पोर्टलच्या त्रुटीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मालमत्ता नोंदणीला फटका; दुपारनंतर सेवा पूर्ववत झाली

धर्मवीर शंभूराजे पुण्यतिथीच्या नियोजनासाठी जिल्हा परिषद सदस्य पैलवान किरण साकोरे, हवेलीचे गट विकास अधिकारी शेखर शेलार यांनी तुळापूर येथे भेट दिली,

सुनील भंडारे पाटील

धर्मपीठ, शक्तीपीठ, प्रेरणापीठ, श्रीक्षेत्र तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम फाल्गुन अमावस्या बुधवार दिनांक 18.5.2026 रोजी समाधी स्थळ तुळापूर येथे होणार असून शासनाच्या वतीने आज नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती,

शंभुराजे पुण्यतिथीच्या दिवशी संपूर्ण राज्यातून तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून शंभू फक्त येत असतात, सर्वांना शासनातर्फे सर्व सोय सुविधा मिळाव्या यासाठी या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते,

त्यामध्ये अल्पोपहार, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृहे, दुचाकी चारचाकी पार्किंग व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, मंडप व्यवस्था, या विषयाचे नियोजन करण्यात आले, या नियोजनाची जबाबदारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांनी घेतली आहे,

या नियोजन बैठकीच्या वेळी जिल्हा परिषद सदस्य पैलवान किरण संपत साकोरे, गटविकास अधिकारी शेखर शेलार, विस्ताराधिकारी शिरीष मोरे, प्रशासक तुळापूर गुंफा ज्ञानेश्वर इंगळे,

प्रशासक केसनंद विशाल हरगुडे, शाखा अभियंता बांधकाम विभाग विनायक जाधव, शाखा अभियंता पाणीपुरवठा विभाग .ए.जी.खान ,ग्रामपंचायत अधिकारी तुळापूर शितल लकारे, ग्रामपंचायत अधिकारी पेरणे दादाभाऊ नाथ ग्रामसेवक वढू खुर्द कानिफनाथ थोरात ,ग्रामसेवक केसनंद गणेश वालकोळी, BRC SBM श्रीमती दिपाली वाघमारे,
CHO डॉक्टर विद्या वांजुळ, सुपरवायजर श्रीमती पल्लवी संकपाळ, H.A.PHC पेरणे.एस.जी.पडवळ, अंगणवाडी सेविका प्रज्ञा ढसाळ, आशा शिवले , नागरमल खंडोबा ट्रस्ट विश्वस्त संपत शिवले , माजी सरपंच संतोष शिवले, जयवंत शिवले, माजी उपसरपंच पवन खैरे , पोपट खुळे, पोलीस पाटील दत्तात्रय शिवले, छत्रपती संभाजी महाराज सोसायटीचे संचालक संजय शिवले, खंडू शिवले, केशव गोसावी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते,

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!