Homehaveliलॅवेंडर रिसर्च सेंटरला डिलाईट फार्मसीच्या विद्यार्थ्यांची भेट 

लॅवेंडर रिसर्च सेंटरला डिलाईट फार्मसीच्या विद्यार्थ्यांची भेट 

लॅवेंडर रिसर्च सेंटरला डिलाईट फार्मसीच्या विद्यार्थ्यांची भेट 

सुनिल भंडारे पाटील

हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट, पुणे येथील लॅवेंडर रिसर्च सेंटरला डिलाईट कॉलेज ऑफ फार्मसी कोरेगाव भीमा येथील बी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली,

फार्मसी क्षेत्रात संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांची माहिती तसेच फार्मसी क्षेत्रात होणारे संशोधन याविषयीची माहिती रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. ज्ञानदेव पठारे व इतर संशोधकांनी मुलांना दिली.

या भेटी दरम्यान मुलांनी फार्मसी क्षेत्रात होणाऱ्या संशोधना विषयी माहिती जाणून घेतली, फार्मसीच्या मुलांमध्ये संशोधन दृष्टी निर्माण व्हावी यासाठी ही भेट दिल्याचे प्राचार्य डॉ. संपत नवले यांनी सांगितले,

यावेळी लॅवेंडर रिसर्च सेंटर व डिलाईट कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यामध्ये परस्पर सामंजस्य करार करण्यात आला, याचा उपयोग मुलांना संशोधन करण्यामध्ये होणार असून, मुलांचा कल संशोधनाकडे वाढेल असा विश्वास प्राचार्य डॉ. संपत नवले यांनी व्यक्त केला.

या भेटीसाठी व सामंजस्य करारासाठी संस्थेचे अध्यक्ष नासिर शेख, ॲड.श्री.जाहिद शेख , कार्यकारी अधिकारी अमीर इनामदार प्राचार्य डॉ. संपत नवले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, भेटीचे नियोजन प्रा. प्राची लोखंडे, डॉ. मंगल गायकवाड व प्रा.अनिल पांचाळ यांनी केले.

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!