Homejunnarराष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जय हिंद संकुलात डॉ मुणगेकर यांचे व्याख्यान

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जय हिंद संकुलात डॉ मुणगेकर यांचे व्याख्यान

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जय हिंद संकुलात डॉ मुणगेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन 

जुन्नर प्रतिनिधी

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जयहिंद शैक्षणिक संकुलात डॉ.प्रतीक मुणगेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. ख्यातनाम शास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय वक्ते असलेल्या मुणगेकर यांनी फिसिक्स मधील रमन इफेक्ट सोप्या भाषेत सांगून सर सी व्ही रमन यांचे विज्ञानातील कार्य सांगितले.

शिक्षणातीला ए आय तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग कसा करावा याबाबत माहिती सांगितली. विद्यार्थ्यांसोबत चर्चाही करण्यात आली. व्याख्यानाचे आयोजन पुणे येथील माशेलकर स्वरूप स्पेस अँड इनोवेशन सेंटर चे अध्यक्ष श्री बाबेल सर, वामन सर तसेच जयहिंद एज्युकेशनल कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

जयहिंद संकुलात वैज्ञानिक मुल्य वाढीस लागण्यासाठी या प्रकारचे अनेक उपक्रम नेहमी राबविले जातात’ अशी माहिती प्रा.डॉ. किरण पैठणकर यांनी दिली. पाहुण्यांचे स्वागत जयहिंद तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. पोखरकर सर यांनी केले.

जयहिंद शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष जितेंद्र शेठ गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दत्तात्रय गल्ले तसेच सर्व संचालक मंडळ यांनी विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!