ॲड. बी एम रेगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
जे का रंजले गांजले
त्याशी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा
देव तेथेची जाणावा
सुनील भंडारे पाटील
वंचितांचे न्याय हक्कासाठी अविरतपणे झटणारे संतुलन संस्थेचे संस्थापक ॲड.बी.एम.रेगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत संतुलन पाषाण शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्सहात संपन्न झाले. या निमित्ताने आधार कार्ड मेळावा, ध्यान धारणा शिबीर, नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार, गुणवत विद्यार्थ्यांचा सत्कार अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते,
नवनिर्वाचित नगरसेवक व माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी संतुलन संस्थेच्या माध्यमातून गरीब वंचित व घटकांना न्याय देण्याबरोबर हक्काच्या लढाईत आपण सहभागी राहून सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
नगरसेवक अनिल सातव यांनी भावना व्यक्त करताना म्हणाले की महापुरुष आम्ही इतिहासात वाचतो पण ऍड. बी.एम रेगे भाऊ आणि ऍड.पल्लवी रेगे दिदी हे वर्तमानात परमेश्वरी कार्यकरत असून त्यांच्या कार्य प्रेरणेचा आदर्श पुढे चालवण्याचे व पुढील पाच वर्षात लोहगांव व वाघोली परिसरातील गोर गरिबांची मनपाच्या स्थरांवरील असलेली सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे उद्घघाटन उपस्थित नगर सेवक रामभाऊ दाभाडे, अनिल सातव, सुर्यकांत गोरे, परमेश्वरी गोरे, वंदना ताई भुजबळ, अँड बी. एम. रेगे, अँड. पल्लवी रेगे आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
या प्रसंगी रामभाऊ दाभाडे, अनिल सातव सह योग प्रशिक्षक सुर्यकांत गोरे, सुदर्शन पिरॅमिड उच्च उर्जा अध्यात्मिक प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षक सुवर्णा खिस्ती, सविता मोहिते, यश बँक मेनेजर विशाल कोरपे, हरी वडमारे, बाळासाहेब बनसोडे, सोमनाथ वडमारे, आशुबा महाराज, आंबादास साळुंखे, मऱ्याप्पा चौगुले, प्यारेलाल जाठव, कांताबाई पवार, कांचन ओव्हळ, कासर नाना, आब्बा जगताप, जॉन फर्नाडीस, प्रशांत कदम तसेच वाघोली, खराडी, लोहगांव, वडगांवशेरी, संतुलन पाषाण शाळतील आजी माजी विद्यार्थी, आदि भागतून मोठ्या संख्येने रेगेभाऊंचे चाहते तसेच संतुलन संस्था व संतुलन महिला पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक संतुलनच्या संचालिका ऍड. पल्लवी रेगे यांनी संतुलनाच्या कार्यावर प्रकाश टाकण्याबरोबरच पाषाण शाळा हा अभिनव उपक्रम सुरु करून वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याचे मत मांडले.
संतुलन संस्थेचे संस्थापक आणि सत्कारमूर्ती ऍड बी.एम रेगे यांनी आपला वाढदिवसाचा विविध व्यक्ती संस्था, संघटना यांच्या कडून केलेला सन्मान हा कामगारांना समर्पित केला. त्यांनी आपल्याला उर्जा मिळते ती वंचितांच्या व अन्यायग्रसांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीतून मिळते व संतुलनने हाती घेतलेल्या गोर गरिबांच्या प्रश्नांवर लढचत राहण्याचा निर्धार जाहीर केला.
सुदर्शन पिरॅमिड उच्च उर्जा अध्यात्मिक प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षिक सुवर्णा खिस्ती व सविता मोहिते यांनी संतुलन पाषाण शाळेतील बालक व पालकांना ध्यान धारणा शिबीरा चे सत्र घेतले. विजय साळवे यांच्या मेलोडी आरकेस्ट्रॉने भरपूर मनोरंजन केले. कार्यक्रमावेळी पाषाण शाळातील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण व गरजू विध्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या वेळी विद्यार्थ्यांनी विविध गुदर्शन कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन संतुलन संस्थेच्या संचालिका ऍड. पल्लवी रेगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या वेळी संतुलन संस्था, संतुलन महिला पतसंस्थाच्या सर्व कर्मचारी कार्यकर्ते, दगडखाण कामगार, रामवाडी परिषदेच्या कार्यकत्यांनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील


