Homeelectionअष्टविनायक यात्रे मध्ये सविता श्रीकांत गावडे यांचा श्री क्षेत्र वाडे बोल्हाईच्या सर्वांगीण...

अष्टविनायक यात्रे मध्ये सविता श्रीकांत गावडे यांचा श्री क्षेत्र वाडे बोल्हाईच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प

अष्टविनायक यात्रे मध्ये सविता श्रीकांत गावडे यांचा श्री क्षेत्र वाडे बोल्हाईच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प………

भरारी न्युज वृत्तसेवा

वाडे बोल्हाईचा सर्वांगीण विकासाचा संकल्प करत सविता श्रीकांत गावडे यांच्या नेतृत्वाखाली अष्टविनायक यात्रेत लोटला जनसागर हवेली तालुक्यातील श्री क्षेत्र वाडेबोल्हाई येथील गावातील सर्व नागरिकांसाठी अष्टविनायक दर्शनाचे मोफत आयोजन गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी ते शुक्रवार दि.२७ फेब्रुवारी या दोन दिवसांच्या कालावधीत करण्यात आले.

श्री क्षेत्र वाडेबोल्हाई माजी उपसरपंच तथा वाडेबोरहाई ग्रामपंचायतीच्या थेट महिला सरपंच पदाच्या इच्छुक उमेदवार सविता श्रीकांत गावडे यांच्या वतीने करण्यात आले असून या अष्टविनायक देवदर्शन यात्रेचे प्रस्थान गुरुवारी, दि. २६ फेब्रुवारी रोजी वाडेबोल्हाई क्रिकेट मैदावरून ट्रॅव्हल्स बसेसच्या माध्यमातून करण्यात आले. या वेळी हजारो ग्रामस्थांनी या अष्टविनायक यात्रेत सहभाग नोंदविला असून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

या अष्टविनायक यात्रेचा शुभारंभ श्री क्षेत्र वाडेबोल्हाई ग्राम नगरीचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ नेते कुशाबा सिताराम गावडे, माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादीचे नेते भाऊसाहेब वारघडे , माजी उपसरपंच तथा जेष्ठ नेते विद्याधर गावडे,  क्षेत्र वाडेबोल्हाईदेवी देवस्थानचे माजी चेअरमन विठ्ठल विष्णु गावडे, तंटामुक्ती माजी अध्यक्ष तथा श्री क्षेत्र वाडेबोल्हाई दिंडीचे संचालक विजय पायगुडे, माजी उपसरपंच अशोक इंगळे, सा. कार्यकर्ते हनुमंत केसवड, माजी ग्रामपंचायत सदस्य कांताराम शिंदे, श्री क्षेत्र वाडेबोल्हाई देवी दिंडीचे मारूती गावडे, तुकाराम गावडे, माजी उपसरपंच तथा ज्येष्ठ नेते विठ्ठल गावडे, माजी आदर्श सरपंच दिपक गावडे, वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीचे सदस्य ज्येष्ठ नेते संतोष चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार भोर, ग्रामपंचायत सदस्य गणेश भोरडे, ग्रामपंचायत सदस्य संध्या योगेश गावडे, माजी उपसरपंच सुरेखा सोपान गावडे, माजी उपसरपंच हारूबाई बळीराम गावडे, माजी सदस्य रोहिणी गावडे, वाडेबोल्हाई दिंडीचे अध्यक्ष ह.भ.प. मल्हारी महाराज गावडे, माजी उपसरपंच समीर भोर, पोलिस पाटील दर्शन चौधरी, पत्रकार विजयराव लोखंडे, नेते नितीन गावडे, आर. पी. आय.चे तालुकाध्यक्ष वैभव शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र भोर, प्रसिद्ध गाडामालक योगेश साठे, सचिन भोर, गोरख काळे, राजेंद्र गावडे, जयवंत गावडे, शरद गावडे, मुलीधर गावडे, लाला गावडे, सुभाष भोर, पंडित भोर, संदीप केसवड , बाळासाहेब पवार, नामदेव गावडे, तुकाराम गावडे, कल्याण चव्हाण, अरुण गावडे, सागर गावडे आदी अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री क्षेत्र वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथे भक्तीचा जनसागर आणि सेवेचा निर्धार… वाडे बोल्हाईपरिसरातील धार्मिक आणि सामाजिक वातावरणात सध्या सविता श्रीकांत गावडे यांच्या कार्याचा मोठा दबदबा निर्माण होत आहे. नुकत्याच आयोजित केलेल्या अष्टविनायक देवदर्शन यात्रेला अभूतपूर्व प्रतिसादामुळे सविता श्रीकांत गावडे यांनी वाडे बोल्हाई राजकारणात आणि समाजकारणात आपली एक वेगळी छाप पाडली आहे. केवळ देवदर्शनच नव्हे, तर सेवा, समर्पण आणि थेट संवाद या त्रिसूत्रीच्या जोरावर वाडे बोल्हाईचा विकास करण्याचा संकल्य त्यांनी या प्रसंगी केला.

भक्तितू शक्तीचे दर्शन अष्टविनायक यात्रेचे भव्य नियोजन महत्वाचे स्थान असलेल्या अष्टविनायक दर्शन घेण्यासाठी वाडे बोल्हाईतील हजारो भाविक माता भगिनी आणि जेष्टासाठी सविता श्रीकांत गावडे यांनी विशेष बस, उत्तम भोजनाची व राहण्याची सोय केली होती. गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात निघालेल्या या यात्रेत संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. शीस्तबद्द व नियोजनबद्ध राबवलेल्या उपक्रमामुळे सविता श्रीकांत गावडे यांच्या कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अष्टविनायक यात्रेच्या माध्यमातून सविता श्रीकांत गावडे यांनी केवळ धार्मिक ओढच नाही, तर आपल्या कामाची तळमळ उपसरपंच असताना ही सिद्ध केली आहे. वाडे बोल्हाईच्या सर्वांगीण विकासाशी बांधील असलेल्या सविता श्रीकांत गावडे यांच्याकडे असलेल्या कामाच्या झपाट्यामुळे त्यांचे चांगलेच वातावरण निर्माण झाले आहे. जनतेच्या सुख दुःखात सहभागी होणारे व वाडेबोल्हाईचा सर्वांगी विकास करणारे नेतृत्व म्हणून त्याची ओळख जनसामान्यांच्या मनात निर्माण होत आहे.

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!