दगड खाणीच्या ठिकाणी मयत अवस्थेत मिळून आलेल्या महिलेच्या खुनाच्या क्लीष्ट गुन्हाचा छडा गुन्हेशाखा युनीट 2 ची कोशल्यपूर्ण कामगिरी
सुनील भंडारे पाटील
पूणे शहरातील दक्षिण बाजूच्या कात्रज मांगडेवाडी येथील डोंगराळ भागात असलेल्या क्रशरखाणी मध्ये एका 40 वर्षीय महिलेचे खाणीतील खोल दरीमध्ये मृतदेह सापडला होता , त्यावरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू क्रमांक 15/2026 अन्वये नोंद करण्यात आली होती.
सदर घटनास्थळावर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी भेटी दिल्या व घटनास्थळ नर्जनस्थव डोगराळ भागातील खाणीतील दरीचे ठिकाण असल्याने सदर मृत्यूबाबत संशय निर्माण झाला होता, त्यानुसार तपास करण्याच्या मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख ,सो पोलीस उप आयक्त (गन्हे) निखील पिंगळे सो ‘ यांनी सूचना दिल्या होत्या.
सदर अकस्मात मृत्यूचा गुन्हे शाखा युनीट 2,पुणे शहर प्रभारी अधिकारी अश्विनी जगताप यांनी त्यांचे पथकातील अधिकारी व अमंलदार यांना प्रामुख्याने व गांभीर्याने तपास करणे बाबत आदेशीत केले असता युनिट 2 यांनी त्यांची दोन पथके तयार करुन मयत महिला (नाव गोपनीय) हिचा संशयास्पद मृत्यूचा तपास सुरू केला असता सदर घटनास्थळ हे डोंगराळ भागातील असल्याने सदर ठिकाणी सी.सी.टी.व्ही कॅमेरे उपलब्ध नव्हते,
तसेच वैदयकीय अहवालानुसार सदर मयत ही घटनास्थळावर मिळून आल्याच्या किमान 24 तास आधी तिचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला होता तसेच मयत महिलेच्या कुंडुबातील लोकांशी चर्चा केली असता सदर प्रकार हा आत्महत्या नसल्याबाबत खात्री पटल्याने यात घातपात असण्याची शक्यता निर्माण झाली,
त्याप्रमाणे वरिष्ठांनी सदर घटनास्थळापासून डोगराळ भागापासून चारही बाजला 3 कि मी परिसरातील तसेच सदर महिला राहत असलेल्या परिसरातील प्राप्त होतील तवढं सी सी टी व्ही फूटेज संकलीत करण्याबाबत सूचना दिल्या,
त्याप्रमाणे महत्वपूर्ण असे 97 फुटेज संकलीत करुन त्याची एकत्रीत पाहणी केली असता त्यामध्ये संशयीत 35 वाहने निवडली त्यातील प्रत्येकांची कसन चौकशी केली असता भारतनगर ,कात्रज,पणे या परिसरात राहणारा रिक्षाचालक केशव कमलेश चौधरी वय 20 यांची देखील रिक्षा सदर वाहनामध्ये होती त्याच्याकडे चौकशी केली असता फुटेजमध्ये दिसत असलेल्या त्याच्या रिक्षाचे हूडमध्ये त्याने जाणीवपूर्वक बदल केलला दिसला त्यामुळे त्याच्यावरील संशय अधिक बळावला,
त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने सदर महिला ही कोंढवा ते कात्रज अशी शेअरींग रिक्षा समजून त्यास हात दाखविला होता तेव्हा त्याचे रिक्षामध्ये त्याचे नशेडी मित्र अब्दुल मोहमंद शेख वय 23 वर्षें व सोनू लक्ष्मण पवार वय 19 वर्षे दोन्ही रा. भारतनगर,रासकर पार्क पूणे असे होते.
सदर महिलेस त्यांनी रिक्षामध्ये घेवून तिला कात्रज येथील सुष्टी हॉटेल येथे सोडण्यास सांगितले असताना देखील तिला शॉटकर्टचा बहाणा सांगून मधल्या रस्त्याने मांगडेवाडी येथोल डोंगरात घेवून गेले, याठिकाणी सदर महिलेने मला इकडून का आणले म्हणून त्यांचेशी वाद केला,
तेव्हा या तिघांनी तिला मांगडेवाडी येथील खाणीतील दरीत फेकून देवून तिचा खून केल्याची कबुली दिली ,सदर प्रकारामध्ये वरील आरोपीचे मित्र महादेव अर्जन व्होरडे, साईं अमित पजारी,सोहेल हनीफ खान यांचाही सहभाग असल्याचे तपासात प्रथमदर्शनी आढळून आल्याने लागलीच वरील व्यक्तींना गुन्हे शाखा यनीट 2 कडील पथकाने ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली,
त्यांना पूढील तपासकामी भारती विद्यापीट पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिल्यावरुन सदर प्रकरणी गुन्हा रजि.क्र.61 /2026 बीएनएस 103(1 ),3(5) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील अधिक तपास चालू आहे,
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त अमितेशकुमार, मा.सह.पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा ,मा.अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त ‘ गुन्हे निखील पिंगळे, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे -1 शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा यनिट 2 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सपोनि अमोल रसाळ व यनिट 2 कडील सपोउनि/ संजय जाधव,पो हवा विजय पवार,नागनाथ राख, सर्जेराव सरगर,योंगेश मांढरे,शंकर नेवसे,संतोष टकले, शंकर कुंभार,अजीम शेख, विनोद चव्हाण,सददाम तांबोळी, साधना ताम्हाणे, संदीप शिर्के,प्रविण उत्तेकर,ओकार कुंभार,विशाल दळवी, रुषीकेश व्यवहारे, संजय आबनावे, विनायक वगारे यांच्या पथकाने केली आहे,

मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील


