Homepoliceहिवरे कुंभार येथे मंजनबाबा दर्गावर बोर्ड,पुन्हा वादाला तोंड

हिवरे कुंभार येथे मंजनबाबा दर्गावर बोर्ड,पुन्हा वादाला तोंड

हिवरे कुंभार येथे मंजनबाबा दर्गावर बोर्ड,पुन्हा वादाला तोंड

सुनील भंडारे पाटील

शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथे मंजन बाबा दर्गा या वादग्रस्त स्थळी नव्याने बोर्ड लावण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा बोर्ड नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले (जि. प. सदस्य, पुणे) यांच्या वतीने लावण्यात आल्याचा आरोप काही ग्रामस्थ व हिंदूवादी संघटनाकडून करण्यात येत आहे.

सदर जागेबाबत प्रकरण सध्या महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड येथे प्रलंबित असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी गावात ग्राम बैठक घेऊन दोन्ही समाजांमध्ये सलोखा राखण्याच्या उद्देशाने निर्णय घेण्यात आला होता. शिक्रापूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्या मध्यस्थीने दर्गाची स्थिती जशी आहे तशीच कायम ठेवण्याचे ठरले होते.

मात्र, बैठकीतील ठरावानंतरही आता जिल्हा परिषद निवडणुकीनंतर नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांच्या सौजन्याने मंजनबाबा नावाचा बोर्ड लावण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांनी “ग्राम बैठकीच्या निर्णयाचे उल्लंघन झाले असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी,” अशी मागणी केली आहे.

दरम्यान, संभाव्य तणाव टाळण्यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीप रतन गायकवाड यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी या वादग्रस्त मुद्द्यावर संबंधितांना पोलीस स्टेशनला बोलवून तोडगा काढण्यात आला होता की, या दर्ग्याची आहे ती स्थिती ठेवावी, त्यामध्ये कुठलाही बदल करू नये,

परंतु आज याचे उल्लंघन करून संबंधित दर्ग्याचे सुशोभकरण करून नाम फलक लावण्यात आला, याबाबत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर ज्या व्यक्तीने बोर्ड लावला त्याने पुन्हा तो बोर्ड काढून टाकला, व पोलीस स्टेशनला हजर झाला, यापुढे या ठिकाणी कुठलाही बदल करू नये अशी समज देण्यात आली,

नवनिर्वाचित पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही,

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!