Homeelectionपैशाचा वापर झाल्याने सरासरीपेक्षा जास्त मतदान नागरिकांमध्ये चर्चा 

पैशाचा वापर झाल्याने सरासरीपेक्षा जास्त मतदान नागरिकांमध्ये चर्चा 

पैशाचा वापर झाल्याने सरासरीपेक्षा जास्त मतदान नागरिकांमध्ये चर्चा 

सुनील भंडारे पाटील 
पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर जास्त झाल्याने मतदानाचा टक्का वाढला असल्याची नागरिकांकडून सांगितले जात आहे, मतदानासाठी उमेदवाराकडून प्रत्येक मताला पैसे वाटले गेल्याने, मतदारांचा उत्साह वाढला त्यामुळे या निवडणुकी मध्ये सरासरी पेक्षा जास्त मतदान झाले आहे,
आतापर्यंत निवडणुकांमध्ये ग्रामपंचायत वगळता इतर निवडणुकांमध्ये साठ टक्के पेक्षा जास्त मतदान होत नाही, परंतु या निवडणुकीमध्ये पैशांचा काळा बाजार जास्त झाला असून निवडणूक आयोगाच्या तसेच प्रशासनाच्या डोळ्यामध्ये धूळ टाकून उमेदवारांकडून कोट्यावधी रुपये खर्च करून निवडणूक लढवण्यात आली,
पुणे जिल्ह्याच्या बऱ्याचश्या भागामध्ये पाच हजारापासून दहा हजार पर्यंत मताचा भाव फुटला होता पैसे वाटून देखील उमेदवारांचा मतदारांवर विश्वास नसल्याने तळी भरणे, भंडारा उचलने, श्री महाकालचे राख हातात घेणे, अशा प्रकारचे साकडे लोकांना घालण्यात आले, उमेदवाराचे देवाला कोढे अशी परिस्थिती दिसत होती,
मग आता देव पावतो की उमेदवाराच्या खोटे पणाचे बक्षीस देतो हे आज समजलेच, पैसे घेतले म्हणजे मतदान करावे लागेल त्यामुळे सरासरी पेक्षा मतदानाचा टक्का वाढला आहे, पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा गावामध्ये 80% पेक्षा जास्त मतदान झाले आहे, अशा प्रकारच्या चर्चेला नागरिकांमध्ये उधान आले आहे,
Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!