लोणीकंद पेरणे जि प गटात प्रदीप भाऊ कंद यांच्या प्रचारासाठी जनतेत थेट आ माऊली आबा कटके
सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदीप भाऊ कंद हे उमेदवार असून कंद यांनी प्रचारामध्ये चांगलीच झेप घेतली आहे, कंद यांच्या मदतीसाठी शिरूर हवेली विधानसभेचे आमदार माऊली आबा कटके हे देखील प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत,
या जिल्हा परिषद गटाची निवडणूक काटे की टक्कर होणार असून कंद यांनी देखील जोरदार तयारी चालवली आहे, सहा महिने चाललेले या तयारीमध्ये त्यांनी अयोध्या काशीयात्रा, तसेच गटामध्ये संवाद मेळावे घेतले आहेत, मध्यंतरी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनाने त्यांना धक्का बसला होता, परंतु त्यामधून सावरत त्यांनी पुन्हा एकदा प्रचार जोराने सुरू केला आहे,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोणीकंद पेरणे जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रदीप भाऊ कंद, लोणीकंद पंचायत समिती गणाचे उमेदवार लोचन शिवले, पेरणे पंचायत समिती गणाचे उमेदवार संगीता वाळके, यांनी गटातील सर्व गावांमध्ये सहकारी संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे,
भावडी ,बकोरी, पिंपरी सांडस, डोंगरगाव, बुर्केगाव,पेरणे या ठिकाणी सहकारी संवाद मिळावे घेण्यात आले, त्यामध्ये प्रचारासाठी शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांनी सहभाग घेतला,

मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील


