लोणीकंद पेरणे जि प गटात भाजपाला प्रचंड बहुमताने विजयी करा प्रदीपदादा कंद,संदीपआप्पा भोंडवे,रवींद्र कंद यांचे आवाहन
सुनील भंडारे पाटील
संपूर्ण पुणे जिल्ह्यात बहुचर्चित असणारा तसेच भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला समजणारा लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गट,या गटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचे विरोधकांना कडवे आव्हान असून भारतीय जनता पार्टीचे तीनही उमेदवार बहुमताने निवडून द्या असे आवाहन करण्यात येत आहे,
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुणे जिल्हा कोर कमिटीचे सदस्य प्रदीप दादा कंद, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र कंद यांनी या गटातील नागरिकांसाठी भविष्यात विकासाची संपूर्ण जबाबदारी घेतली असून गेल्या दोन महिन्यात स्वखर्चाने कामे केली आहेत,
ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गटातील जिल्हा परिषदेचे उमेदवार पैलवान किरण साकोरे, लोणीकंद गणाचे उमेदवार मोनिकाताई कंद, पेरणे गणाचे उमेदवार स्वाती वाळके, यांनी प्रचारामध्ये आघाडी मिळवली आहे, संपूर्ण जिल्हा परिषद गटात कमळ जणू फुलले आहे, एकंदरीत या गटात भारतीय जनता पार्टीला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला असून तीनही उमेदवार विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे,
9



