केसनंद कोरेगावमूळ जि प गटात सुरेखाताई हरगुडे यांचा प्रचार थेट शेतात विरोधकांना फुटले घाबरे
सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रभावी ठरणाऱ्या केसनंद कोरेगाव मुळ जिल्हा परिषद गटामध्ये सुरेखाताई हरगुडे प्रचारामध्ये शिग्गा ठरल्या असून त्यांनी आपल्या प्रचाराचा मोर्चा थेट शेतातील काम करणाऱ्या शेतकऱ्यांकडे वळवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे, परिणामतः विरोधकांना मात्र घाबरे फुटले आहे,
हरगुडे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार असून केसनंद वाडेबोल्हाई पंचायत समिती गणाचे उमेदवार प्रमोद चंद्रकांत हरगुडे व कोरेगाव मूळ पंचायत समिती गणाचे उमेदवार कृषीराज दत्तात्रय चौधरी या तीनही उमेदवारांनी प्रचारात कुठलीच कुचराई केली केली नाही,
सुरेखाताई हरगुडे या स्वतः शेतकरी कुटुंबातल्या असून या भागात सद्यस्थितीत शेतकऱ्यांची शेती कामे चालू असल्याची कल्पना त्यांना चांगली आहे, त्या जिल्हा परिषद गटातील अष्टापुर गावामध्ये प्रचारासाठी गेल्या असता त्यांनी आपल्या प्रचाराचा मोर्चा थेट शेताकडे वळवला, तसेच शेतकरी महिलांशी संवाद साधला, त्यामुळे त्यांचे सर्व भागातून कौतुक होत असून यामुळे विरोधकांना मात्र चांगलेच घाबरे फुटले आहे,

मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील


