Homeelectionधानोरी, तळेगाव ढमढेरे, दहिवडी या गावांमध्ये दिपालीताई गव्हाणे यांना चांगला प्रतिसाद 

धानोरी, तळेगाव ढमढेरे, दहिवडी या गावांमध्ये दिपालीताई गव्हाणे यांना चांगला प्रतिसाद 

धानोरी, तळेगाव ढमढेरे, दहिवडी या गावांमध्ये दिपालीताई गव्हाणे यांना चांगला प्रतिसाद 

सुनील भंडारे पाटील

तळेगाव ढमढेरे रांजणगाव सांडस गटात दिपालीताई गव्हाणे यांनी जोरदार निवडणुकीचा प्रचार चालवला असून या गटातील सर्वच गावांमधून गव्हाणे यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, काल प्रचारादरम्यान धानोरी ,तळेगाव ढमढेरे तसेच दहिवडी गावामध्ये प्रचार करत असताना त्यांना ग्रामस्थांनी चांगली साथ दिली,

गव्हाणे यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाल्यानंतर तळेगाव ढमढेरे रांजणगाव सांडस या जिल्हा परिषद गटामध्ये सर्वांनाच समाधान वाटले, या गटामध्ये चौरंगी लढत होणार असून भारतीय जनता पार्टीची ताकद जास्त आहे, असे एकंदरीत जनसंपर्कातून जाणवत आहे, गव्हाणे यांनी या जिल्हा परिषद गटातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच महिला भगिनी यांच्या सहकार्यातून प्रचारात चांगलीच भरारी मारली आहे,

धानोरी, तळेगाव ढमढेरे, दहिवडी या गावामध्ये काल प्रचारा दरम्यान या गावातील लोकांनी चांगली साथ दिली, तसेच संपूर्ण पाठिंबा दिपाली ताई गव्हाणे यांना जाहीर करत आमचे भवितव्य कमळ चिन्हातच दडलेली आहे, त्यामुळे आम्ही कमळ या चिन्हालाच मतदान करणार अशी ग्रामस्थांनी प्रतिक्रिया व्यक्त केली,

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!