HomeAlandiआळंदी येथे इंद्रायणी घाटावर स्वच्छता इंद्रायणी आरती उत्साहात

आळंदी येथे इंद्रायणी घाटावर स्वच्छता इंद्रायणी आरती उत्साहात

आळंदीत एकादशी दिनी भाविकांची दर्शनास गर्दी ; श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्पसजावट
इंद्रायणी घाटावर स्वच्छता ; इंद्रायणी आरती उत्साहात

आळंदी प्रतिनिधी 

आळंदी येथे विजया एकादशी दिनी माऊली मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पन्नास हजारावर भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली.

एकादशी दिनी भाविकांनी मंदिर, नगरप्रदक्षिणा करीत हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले. मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावटीने श्रींचे रूप लक्षवेधी दिसत होते. इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता आणि इंद्रायणी आरती विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे हस्ते विविध मान्यवरांचे उपस्थितीत झाली.

यावेळी महिला भाविकांची उपस्थिती मोठी होती. देवस्थान तर्फे विश्वस्त रोहिणी पवार यांनी आरतीचे नियोजन केले.

आळंदी मंदिरात भाविकांनी परंपरेने एकादशी दिनी गर्दी करीत श्रींचे दर्शन घेतले. एकादशी दिनी श्रींचे मंदिरात पहाटे वेदमंत्र जयघोषात पवमान अभिषेक करण्यात आला. यावेळी आळंदी देवस्थांनचे पदाधिकारी, श्रींचे मानकरी, पुजारी, सेवक कर्मचारी आदि उपस्थित होते. भाविकांना श्रींचे मंदिर दर्शनास प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे यांचे नियंत्रणात कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था व्यवस्थापक माउली वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने यांनी सेवक, कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांचे सहकार्याने केली. मंदिरात दुपारचा फराळाचा महानैवेद्य, देहूकर यांचे तर्फे कीर्तन सेवा रुजू झाली. रात्री श्रींची, तसेच इंद्रायणी नदी घाटावर उपसभापती निलमताई गोऱ्हे यांचे हस्ते इंद्रायणी आरती झाली.

श्रींचे दर्शन, प्रदक्षिणा पूर्वी भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर गर्दी केली. आळंदी मंदिरात भाविकांनी धुपारतीस गर्दी केली. एअकादशी दिनी कीर्तन सेवा हरिनाम गजरात झाली.

मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम झाले. यावेळी सुरक्षा रक्षक, सेवक आणि मंदिरातील बंदोबस्ता वरील पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले. यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब यांनी मार्गदर्शन केले.

आळंदीत सुरक्षित, सुरळीत वाहतूक राहावी यासाठी आळंदी दिघी वाहतूक पोलीस शाखेने परिश्रम पूर्वक काम पाहिले. आळंदीतील रहदारीची वर्दळ पाहता येथे वाहतुकीचे केलेले प्रभावी नियोजन यामुळे भाविक, नागरिक यांना वाहतुकीचे कोंडीतून एकादशी दिनी मुक्तता मिळाली. आळंदीत भाविकानी पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले. आळंदीत बेकायदेशीर वाहन पार्किंग आणि बेशीस्त वाहन चालकांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे.

कारवाई टाळण्यासाठी आळंदीत रस्त्यावर वाहने पार्क करू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
अलंकापुरीत एकादशी दिनी इंद्रायणीची आरती उत्साहात

येथील इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ, ग्रामस्थ, आळंदी देवस्थान, आळंदी नगरपरिषद पदाधिकारी यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली. यावेळी केशर बाई कदम, रीना पवार, जयश्री टकले, वर्षा खिल्लारी, पंचफुला तंवर, सरस्वती भागवत, पुष्पा लेंडघर, सुरेखा काळभोर, राधा पगारे, सुवर्णा काळे, मेघा काळे, उषा पाटील, शिवांश पवार, सावित्रीबाई घुंडरे, शीला कुलकर्णी, शालन मेदनकर आदी महिला उपस्थित होते. एकादशी दिनी इंद्रायणी आरती करून नदी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली. यावेळी स्वचतेचा उपक्रम महा स्वच्छता अभियान राबवित करण्यात आला. नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपाध्यक्षा सुजाता तापकीर, मुख्याधिकारी माधव खांडेकर, माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, आजी, माजी नगरसेवक, नगरसेविका, विविध सेवाभावी संस्था, आमदार बाबाजी काळे, माउली घुंडरे पाटील, माउली महाराज जाधव, विविध वारकरी शिक्षण संस्था, महाविद्यालये यांचेसह आळंदीकर सहभागी झाले होते. सकाळी स्वच्छता उपक्रम आणि संध्याकाळी इंद्रायणी आरती, पसायदान उत्साहात झाले. यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, अमर गायकवाड, अनिता शिंदे, शोभा कुलकर्णी, सुवर्णा काळे आदींसह महिला भाविकांनी इंद्रायणी आरती केली.

प्रसाद वाटप उत्साहात झाले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तत्पूर्वी माउली मंदिराचे महाद्वार विकासाचे अनुषंगाने शिलापूजन आळंदी देवस्थानचे वतीने खान्देशकर गाडेगावकर महाराज धर्मशाळेच्या प्रांगणात हरिनाम गजरात वेदमंत्र जयघोषात झाले.

यावेळी उपसभापती निलमताई गोऱ्हे, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपाध्यक्ष सुजाता तापकीर, प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त निलेश महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, योगी निरंजननाथ, माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी सभापती श्रीधर कुऱ्हाडे, डी.डी.भोसले पाटील, मुख्याधिकारी माधव खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. विजया एकादशी दिनी आळंदीत विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम उत्साहात राबविण्यात आले.

इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानात खेड आळंदी विधानसभा मतदार संघाचे आमदार बाबाजीशेठ काळे यांची प्रत्यक्ष उपस्थिती लाभली. आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे पाटील यांनी प्रशासन व नागरिकां सोबत स्वच्छतेचा दृढ संकल्प करीत अभियान राबविले. आवेकर भावे रामचंद्र संस्थान ट्रस्ट मंदिरात कल्याण महाराज कल्याणकर यांची कीर्तन सेवा झाली.

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!