वढु बुद्रुक केंदूर रस्त्यावर ब्रीजा गाडीचा अपघात पाच जण जखमी
सुनील भंडारे पाटील
वढू बुद्रुक तालुका शिरूर ते केंदूला जाणाऱ्या रस्त्यावर आज एका ब्रीजा गाडीचा अपघात होऊन पाच जण जखमी झाले आहेत, त्यामध्ये वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालय यात दाखल केले आहे,
याबाबतची माहिती अशी की, केंदूर गावचे रहिवासी विक्रम साकोरे आपल्या कुटुंबासह केंदूर बाजूने वाजेवाडी चौफुला दिशेने वढू बुद्रुक गावाकडे येत असताना साकोरे यांचा गाडी चालवत असताना ताबा सुटला व ब्रीजा गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या बाभळीच्या झाडावर जोरदार जाऊन आदळली,
या अपघातात साकोरे यांचे कुटुंब होते त्यामध्ये त्यांची पत्नी ,मुलगा, व दोन वयस्कर आजी होत्या हे पाचही जण जखमी झाली असून एक आजीची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे,

मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील


